शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

संत तुकोबांचा पालखी सोहळा कविवर्य मोरोपंतांच्या कर्मभूमीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 6:28 PM

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी बारामती शहरात कविवर्य मोरोपंत पराडकरांच्या व शिवलीलामृताचे रचनाकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला.

ठळक मुद्देपालखी सोहळ्याचे बारामतीत उत्स्फूर्त स्वागत; शहर भक्तिमय 

तेजस टवलारकर 

बारामती : सावध जालो सावध जालो । हरिच्या आलों जागरण                  तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे !

                 पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥                 तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी बारामती शहरात कविवर्य मोरोपंत पराडकरांच्या व शिवलीलामृताचे रचनाकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात वारकरी तुकोबांच्या पालखी सोहळ्यासह बारामती मुक्कामी नगर पालिकेच्या समोरील शारदा प्रांगणात विसावल्या.हातात भगवा झेंडा, गळ्यात वीणा आणि मुखी तुकाराम माउलींचा जयघोष करत बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी।   येथील मुक्कामाहून  सकाळी बारामतीच्या दिशेने निघाला संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबांचा पालखी सोहळा उंडवडी पठार, बऱ्हाणपूर , मोरेवाडी या मार्गे  मंगळवारी  बारामती शहरात दाखल झाला. पालखी सोहळ्याचे शहरात जंगी स्वागत झाले. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखी सोहळा मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. स्वागत फलक लावण्यात आले होते. स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. तुकोबांच्या पालखी सोहळा दरम्यान सोहळा मार्गावर शालेय विद्यार्थिनींचे पथक व वारकऱ्यांच्या सुविधेची व्यवस्था करत होते. चहा, पाणी, नाश्ता तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. थकलेल्या वारकरी बंधुंसाठी औषध उपचार देण्यात आले. 

शारदा प्रांगणात पालखी येताच पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल ! श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करून खांदेकऱ्यांनी पालखी मंडपात स्थानापन्न केली. समाज आरती झाल्यानंतर दर्शनरांगा खुल्या करण्यात आल्या.

बारामती शहर आणि परिसरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आणि संघटनांतर्फे उपवासाचे पदार्थ देऊन वारकऱ्यांची सेवा केली. शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्रीराम मंदिर ,सिद्धेश्वर मंदिरासह सर्व मंदिरांमध्ये वैष्णव विसावले. थोडा विसावा घेऊन वारकरी पुन्हा भजन आणि कीर्तन करीत हरिनामामध्ये दंग झाले.बुधवारी सकाळी सणाच्या दिशेने पालखी मार्गस्थ होणार आहे .........,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वारकऱ्यांनी लुटला वातावरणाचा मनसोक्त आनंद  दिवसभर थंडगार हवा सुरू होती. त्याचबरोबर ढगाळ वातावरण होते. गवळ्याची उंडवडी ते बारामती हा कमी अंतराचा मार्ग आहे म्हणून वारकरी हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत वाटचाल करत होते. कोणी  शेतविहारात आराम करत होते, तर कोणी अंघोळ करत , काही जणांनी थंड वातावरणात भाकरी, पिठलाच आंनद घेतला, काही जण चहाचा आस्वाद घेत होते अशा प्रकारे करमणूक करत वारक?्यानी बारामती गाठले 

तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग....दरवर्षीच पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी उसळते. यंदाही तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली  याचबरोबर बारामती शहराच्या परीसरातील गावातुन भाविक पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी सहभागी झाले होते

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी