शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

आसमंत दुमदुमे इतुका जाहला भक्तिचा गजर; बिकट रोटी घाट होई सहजे पार..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 8:15 PM

संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी सहा बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या...  

ठळक मुद्देपालखी उंडवडी मुक्कामी  : हिंगणीगाडा येथील नागेश्वर मंदिरात विसावा

- तेजस टवलारकर-  

उंडवडी : पंढरीच्या मार्गावर अवघड ते काय असे.. एक एक क्षण होई मग हरिमय.. डोक्यावर पावसाच्या सरी, मुखात हरिनाम सोबतीला मग टाळ, मृदूंग वीणेचा तो गजर अशाच उत्साहपूर्ण वातावरणात विठ्ठलाच्या दर्शनातील अवघड समजला जाणारा रोटी घाट संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सहज लीलयापार केला..

    पंढरीच्या मार्गात सर्वात अवघड रोटी घाटाची नागमोडी वळणाची चढण डोळ्यासमोर ठेवून हरिनामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या वरवंड ग्रामस्थांचा निरोप घेतला. सकाळी लवकर वाटचाल सुरू झाली त्यावेळी ढगाळ वातावरण होते. वरूण राजाच्या आगमनाने सुखावलेला वारकरी अवघड घाटही आनंदाने सर करता झाला.. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी सहा बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या.  विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी पालखी रथ ओढत होते. यामुळे अवघड टप्पा तुकोबारायांच्या पालखीने सहज पार केला. रोटी ग्रामस्थांनी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर समाज आरती झाली. चोपदारांनी इशारा करताच पुंडलिका वर देव हारी या विठ्ठलाच्या  जयघोषाने परिसर दणाणून गेला. त्यानंतर घाटात मृदंगाच्या तालावर ताल वारकरी नाचण्यात दंग झाले होते. वारकºयाचा आनंद शिगेला पोचला होता. सभोवतालचा हिरव्यागार शिवाराचा आनंद वारकरी घेत होते. या उत्साही वातावरणात घाटाच्या वळणावरून पालखी सोहळा हळू हळू पुढे सरकत होती.पाटस गावातील अनेक भाविक संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत रोटी घाट पार करण्यासाठी आले होते. रोटी घाट आज वारकºयांनी फुलून गेला होता. लाखो वारकरी टाळ, मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत चालले होते. अनेक वारकºयांनी भजन करीत, नाचत रोटी घाट पार केला. रोटी घाटात टाळ मृदुंगाचा आवाज आणि विठ्ठल नामाचा जयघोष घुमत होता. गवत उगवल्याने हिरव्या झालेल्या रोटी घाटात वारकऱ्यांच्या खांद्यावर डौलाने डोलणाऱ्या भगव्या पताका लक्षवेधी ठरत होत्या.  त्यानंतर हिंगणी गाडा  येथील नागेश्वर महाराज मंदिरातील विसाव्यानंतर जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान वासूनदे, खाडवडीमार्गे उंडवडी गवळ्याची येथे पोहचणार आहे. आजचा मुक्काम उंडवडी येथे होणार आहे. मंगळवारी सकाळी बारामतीच्या दिशेने पालखी मार्गस्थ होणार आहे ........

 

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा