शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

...असं जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही; राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 10:51 IST

लोकशाहीचे रक्षण करणे हे आमच्या इतकेच प्रकाश आंबेडकरांचेही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलाय असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - Sanjay Raut on Prakash Ambedkar ( Marathi News ) २७ तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे. आम्ही अत्यंत सन्मानाने वंचित बहुजन आघाडीला चर्चेला बोलावले आहे. जागावाटपाची चर्चा एकत्र होईल. आधी ३ पक्षांनी जागावाटप करावे आणि त्यानंतर आम्हाला हव्या त्या जागा आम्ही मागून घेऊ अशी त्यांची भूमिका आहे. परंतु अशाप्रकारे जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही. आंबेडकरांना राजकारण उत्तम कळते, त्यांना भूमिकाही कळतात. त्यांना कुठल्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही त्यांच्या भूमिकेवर बैठकीत चर्चा करू. प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार नाहीत असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्हाला मविआचा घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती. त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेतले. त्यामुळे मविआच्या बैठकीत ते सहभागी होतात. लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेतही ते सहभागी होतात. या देशात संविधान वाचवण्यासाठी लढाई आहे. हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आम्ही संविधान वाचवण्यासाठी सगळे संघर्ष करतोय. मोदी-शाह यांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी ज्यांचे एकमेकांसोबत मतभेद आहेत हे पक्षही काँग्रेससह एकत्रित आलेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच उत्तर प्रदेशात मायावतींचा मार्ग वेगळा आहे. कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायचीय. प्रकाश आंबेडकर हे मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत हा विश्वास आहे. कारण देशातील संविधान वाचवणे ही आमच्या इतकीच त्यांची जबाबदारी आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना, लोकशाहीचे रक्षण करणे हे आमच्या इतकेच प्रकाश आंबेडकरांचेही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलाय. आमच्या बैठकीत ते सहभागी होतात. प्रकाश आंबेडकर यांच्या त्यांच्या भूमिका जाहीरपणे मांडत असतील हा त्यांचा प्रश्न आहे असं राऊतांनी स्पष्ट केले. 

...तर देशच भाजपामुक्त होईल

सध्याचा मोदी-शाह यांचा भाजपा पक्ष हे कुठलीही लोकशाही आणि देशाचे संविधान मानायला तयार नाहीत. छोटे पक्ष संपवा हे बावनकुळेंचे विधान केले, ही लोकशाही त्यांच्या बापजाद्याने आणलीय का? काही वर्षापूर्वी जे.पी नड्डा यांनी याच प्रकारे विधान केले. या देशात केवळ एकच पक्ष राहील तो भाजपा, हे हुकुमशाहीची भाषा होती. आज जे.पी नड्डा आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतायेत. अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष यांना घेऊन एनडीए उभारावी लागते. २०२४ मध्ये तुमचा पक्ष राहतोय का हे पाहावा. भाजपा पूर्ण काँग्रेसमय झालेला आहे. जे लोक गेलेत त्यांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजपा खाली होईल. ३०३ खासदारांपैकी केवळ ११० खासदार मूळ भाजपाचे आहेत. बाकी सर्व इतर पक्षातून आलेले आहेत. या आमदार, खासदारांनी भाजपा सोडायचा निर्णय घेतला तर हा देशच भाजपामुक्त होईल असा टोला संजय राऊतांनी लगावला. 

भाजपाची भूमिका महाराष्ट्र आणि देशाला घातक

आजही भाजपाला त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील प्रमुख लोकांची गरज लागते. तुम्ही इतकी वर्ष का उपटत बसला होता? आम्ही याला संपवू, त्याला संपवू ही जी तुमची ताकद आहे ती परावलंबी आहे. लहान पक्ष संपवू हीच तुमची भूमिका हुकुमशाहीच्या दिशेने नेणारी आहे. या देशात लोकशाही संपवायची, लहान पक्षांना संपवायचे, मोठ्या पक्षांना फोडायचे ही भाजपाची भूमिका महाराष्ट्र आणि देशाला घातक आहे. या देशातून लोकशाही नष्ट करायची, लिहिण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र हिसकावयचे, निवडणुका घेणे बंद करायच्या या भाजपाच्या धोरणाविरोधातच आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. २०२४ च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवतंय, जनता कुणाला गाडणार हे कळेल. त्यामुळे बावनकुळेंनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावे असा घणाघात संजय राऊतांनी भाजपावर केला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी