शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Sanjay Raut : "...म्हणून प्रत्येकाला थोडा थोडा त्याग करावाच लागेल"; 'त्या' जागेसाठी संजय राऊतांचं सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 10:54 IST

Sanjay Raut : पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. य़ाच दरम्यान यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

गिरीश बापट यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता खुद्द अजित पवार यांनीच दावा केला आहे. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे असूनही पवार यांनी त्यावर राष्ट्रवादीचा दावा केला आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत हा जागा सोडणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. य़ाच दरम्यान यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. "संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल" असं म्हटलं आहे. 

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कसेल त्याची जमीन या प्रमाणे... जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर "कसबा" प्रमाणे पुणे "लोकसभा" पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

टिंबर मार्केट येथे गुरुवारी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी पोटनिवडणूक जाहीर होणार असल्याची माहिती असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आता लोकसभेची मुदत संपण्यात फक्त वर्षाचा कालावधी बाकी असल्याने पोटनिवडणूक घेणार नाहीत असे वाटत होते, मात्र आता मला अशी माहिती मिळाली आहे की पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.

सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की, पोटनिवडणूक किंवा निवडणूक प्रत्येक जागा विरोधकांनी जिंकायला हवी. त्यानुसार व्यूहरचना करावी लागेल. पुणे शहरात आमची राजकीय ताकद जास्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही ती दाखवली. आमचे ४० पेक्षा जास्त नगरसेवक होते तर काँग्रेसचे फक्त १०. अशा स्थितीत ही जागा हातची का घालवायची? असा विचार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी असे आमचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले. जिथे ज्यांची ताकद जास्त ती जागा त्यांनी लढवावी, असे साधे सूत्र आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस