शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:39 IST

Sanjay Raut, Hindi Language in Maharashtra Schools: ९०% पुरस्कार प्राप्त आणि लाभार्थी हे सरकारचे लाचार, असेही संजय राऊत म्हणाले

Sanjay Raut, Hindi Language in Maharashtra Schools: राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा गाजतोय. महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकण्याची सक्ती केली होती. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली. महाविकास आघाडीने हा मुद्दा चांगलाच लावून धरला. त्यानंतर रविवारी बोलताना, त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र यावरही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. तसेच, मराठी सेलिब्रिटी, अभिनेते, क्रिकेटपटू यांच्यावरही राऊतांनी सवाल उपस्थित केले.

"साहित्यिकांची मुले आणि नातवंडे इंग्रजी शाळेत शिकत आहेत. काहींची मुले तर परदेशात आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही सांगू नका. बैठका घेण्याची काहीही गरज नाही. बैठकीचे गुऱ्हाळ चालू आहे हा मराठी भाषेचा अपमान आहे. हिंदी भाषेचा दबाव सुरू आहे, त्या विरोधात साहित्यिक, सेलिब्रिटी पेटून उठले असते. दक्षिणेत प्रकाश राज या विरोधात रोखठोक बोलत आहेत. पण इथे महाराष्ट्रात कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे, पण मराठीवर असे हल्ले होत असताना तुम्ही सर्वजण गप्प आहात," अशा शब्दांत संजय राऊतांनी मराठी सेलिब्रिटींवर टीकास्त्र सोडले.

"साहित्यिकांच्या बाबतीत आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहेत की, ९०% पुरस्कार प्राप्त आणि लाभार्थी हे सरकारचे लाचार आहेत. या सर्व साहित्यिकांची मुले परदेशात शिकत आहेत किंवा शिकून आलेली आहेत. या मुलांना ना मराठीचा गंध आहे ना हिंदीची जाण आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या सर्व नेत्यांची मुले विदेशी शाळांमध्ये शिकत आहेत. मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या. मला यावर बोलण्याचा अधिकार आहे. आमची मुलं मराठी शाळेत शिकले आहेत. किती भाजपावाल्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत त्याच्या याद्या काढा. तुम्हालाही माझं म्हणणं समजेल," असेही संजय राऊत रोखठोकपण म्हणाले.

टॅग्स :hindiहिंदीmarathiमराठीSanjay Rautसंजय राऊतPrashant Damleप्रशांत दामलेNana Patekarनाना पाटेकरMadhuri Dixitमाधुरी दिक्षित