Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:32 IST2025-07-04T16:31:09+5:302025-07-04T16:32:32+5:30
Sanjay Raut And Eknath Shinde : संजय राऊत यांनी 'जय गुजरात' वरून एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी आणि हिंदीवरून वाद सुरू असतानाच पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केलं. भाषण संपतानाच शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा दिला.
संजय राऊत यांनी 'जय गुजरात' वरून एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं" असं म्हणत टीका केली आहे. तसेच "हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?" असा सवालही विचारला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 4, 2025
पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली!
काय करायचे?
ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा
हजार माराव्या आणि एक मोजाव्या
हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?
@Dev_Fadnavis pic.twitter.com/gHhMo8cpA2
"अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं. पुण्यात या महाशयांनी अमित शाह यांच्यासमोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचं? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे. शाह यांच्यासाठी शिंदे यांनी एक शेर ऐकविला. "आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है, आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है" असा हा शेर शिंदे यांनी ऐकवला.