'...तर मला अटक करुन दाखवा'; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:27 IST2021-09-05T12:21:39+5:302021-09-05T13:27:42+5:30
Sanjay raut slams chandrakant patil: 'सरकार येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.'

'...तर मला अटक करुन दाखवा'; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान
मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी(bhagat singh koshyari) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत(sanjay raut) यांनी टीका केली होती, असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. त्यावर आता स्वतः राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'राज्यपालांवर मी टीका केली नाही. भाजपला तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी', असं थेट आव्हान संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील(chandrakant patil) यांना दिल आहे.
https://t.co/TBdvIWRBD1
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021
'इन्फोसिसने तयार केलेल्या कर भरण्याच्या प्रणालीतील त्रुटींमुळे लोकांचा कर प्रणालीवरील विश्वास कमी होत आहे.'#rss#Infosys
त्यांनी मानसिक स्वास्थ्य नीट केलं पाहिजे
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांवरील टीकेवर स्पष्टीकरण दिले. राज्यपाल आमच्यासाठी 'नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. मी राज्यपालांवर टीका केली नाही. पण,तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा', असं थेट आव्हानच राऊतांनी दिलं. याशिवाय, राऊत यांना चंद्रकांत पाटलांनी कंपाऊंडर म्हणून टोमणा मारला होता. त्यावरही त्यांनी सडकून टीका केली. 'चंद्रकांत पाटलांनी आपल मानसिक स्वास्थ्य नीट केलं पाहिजे. सरकार येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त आहेत', असा हल्ला राऊतांनी चढवला.
https://t.co/KFexRImUHz
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021
'सरकारकडून भ्रमनिरास झाला असेल तर राजू शेट्टींनी सरकारमधून बाहेर पडावं.'#RajuShetti#sadabhaukhot
सरकार पडणार नाही
चंद्रकांत पाटलांनी काल टीका करताना 'राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी?' असा प्रश्न केला होता. त्यावर उत्त देताना राऊत म्हणाले की, 'कधी काळी नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते, आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांशी चांगले संबंध आहेत. शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये. सरकार पडणार नाही', असं राऊत म्हणाले.
आमच्याकडे दंड आणि दांडा...
यावेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर केलेल्या एका टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. 'राऊतांच्या दंडात ताकद आहे का?' असा बोचरा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, 'शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला, इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो', असा इशारा त्यांनी दिला.