"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 00:14 IST2024-10-03T00:14:21+5:302024-10-03T00:14:46+5:30
Sadabhau Khot Criticize Sanjay Raut: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत म्हणाले की, महायुतीचे नेते बैल आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊत यांनी बैलांचा अपमान केला आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. बैलाला जेवढी अक्कल असते तेवढीही अक्कल संजय राऊत यांना नाही. शेतकऱ्यांच्या घरात खिल्लारी बैल असतात. खिल्लारी बैलांची शिंगं टोकदार असतात. गावगाड्यातली ही टोकदार शिंगं आता तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणात नाहीत, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांना दिला.