संजय राऊत आदित्यना चावले, म्हणून त्यांचीही वक्तव्ये...; संजय शिरसाटांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 14:52 IST2023-10-02T14:51:24+5:302023-10-02T14:52:02+5:30

संजय राऊत बोलत असतात ते समजू शकतो, परंतू आदित्य ठाकरे देखील आता त्यांच्यासारखे काहीही बोलायला लागले आहेत. - शिरसाट

Sanjay Raut bit Aditya thackeray, so his statements too...; Criticism of Sanjay Shirsat | संजय राऊत आदित्यना चावले, म्हणून त्यांचीही वक्तव्ये...; संजय शिरसाटांची टीका

संजय राऊत आदित्यना चावले, म्हणून त्यांचीही वक्तव्ये...; संजय शिरसाटांची टीका

ठाकरे गटाचा मेळावा शिवाजीपार्कवरच होणार हे जे संजय राऊत यांनी वक्तव्य केलेय ते बेसलेस आहे. दोन्ही गटांनी परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. आमचा यंदाचाही दसरा मेळावा जोरातच होईल असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

संजय राऊत बोलत असतात ते समजू शकतो, परंतू आदित्य ठाकरे देखील आता त्यांच्यासारखे काहीही बोलायला लागले आहेत. संजय राऊत आदित्यना चावले आहेत, यामुळे ते देखील राऊतांसारखी वक्तव्ये करत आहेत. फडणवीसांनी बालबुद्धी म्हटले होते. बाळ बुद्धी नाही. या लोकांनी स्वतःचे नाव जरी बाळासाहेब ठेवले तरी तो त्याग त्यांच्यात येणार नाही, अशी टीका शिरसाट यांनी केली.

यांची जेव्हा सत्ता होती तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची एक वीट सुद्धा रचली नाही. आदित्य ठाकरे सध्या भ्रमात आहेत.  कारण ट्विट केल्याने दौरे रद्द होत नाहीत, असा टोला शिरसाट यांनी लगावला. 

Web Title: Sanjay Raut bit Aditya thackeray, so his statements too...; Criticism of Sanjay Shirsat