शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

"भाजपने तिसरा उमेदवार दिला तरी..."; संजय पवार, राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 4:15 PM

Sanjay Raut and Sanjay Pawar : गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते, खासदार उपस्थित होते. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाने तिसरा उमेदवार दिला तरी माझे लक सुरु आहे, महाविकास आघाडी सरकार या शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणेल, असे संजय पवार यांनी सांगितले. याचबरोबर,जो विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखवलेला आहे, तो सार्थ ठरवेन. छत्रपती हे आमचे दैवत आहेत, मी संभाजीराजेंना भेटणार आहे. चर्चेत नाव असणे आणि नाव फायनल होणे यात खूप फरक आहे. मी पण मराठा आहे, समाजाच्या प्रत्येक आंदेलनात मी होतो, असे संजय पवार म्हणाले. 

याचबरोबर, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय आमचाच होणार, असा विश्वास व्यक्त करत संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. तसेच,  शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे विजय निश्चित असल्याचे संजय राऊत म्हणाले.

गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते, खासदार उपस्थित होते. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सेनेचे सगळे मंत्री, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. 

दरम्यान, राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. सध्या विविध पक्षीय बलानुसार भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. तर उर्वरित एका जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. सहाव्या जागेसाठी संभाजी छत्रपती देखील उत्सुक होते, मात्र त्यांना शिवसेनेने पुरस्कृत उमेदवारी ऐवजी पक्षात प्रवेश घेऊन अधिकृत उमेदवार व्हा, अशी ऑफर दिली होती. पण संभाजी छत्रपतींनी ही ऑफर नाकारली आहे. अखेर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Pawarसंजय पवारRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र