"मातोश्रीवर बाळासाहेबांच्या शेजारी औरंगजेबाचा फोटो लागेल", शिंदेसेनेच्या नेत्याची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:04 IST2025-03-23T13:01:25+5:302025-03-23T13:04:47+5:30
Sanjay Nirupam on Uddhav Thackeray : "नागपूरच्या दंगलखोरांना उबाठाचा पाठिंबा. मुस्लीम मतांसाठी उबाठा लाचार झाली."

"मातोश्रीवर बाळासाहेबांच्या शेजारी औरंगजेबाचा फोटो लागेल", शिंदेसेनेच्या नेत्याची बोचरी टीका
Sanjay Nirupam on Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण तापले आहे. अनेक हिंदू संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमधून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आहेत. यामुळे तिकडे नागपूरमध्ये मोठा हिंसाचारही झाला असून, अनेक शहरांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना(उबाठा) नेते संजय राऊत या मुद्द्यावरुन सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. अशातच आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या वादात उडी घेतली आहे.
उबाठाला देशातील तैमुरांची काळजी
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "आज संजय राऊत म्हणाले की, करीना कपूर आणि सैफ अली खान पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांना(पीएम) तैमुरची जास्त काळजी वाटत होती. त्यांना ही बाब कशी समजली ते मला माहित नाही. पण, मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की, संजय राऊत आणि संपूर्ण उबाठाला देशातील तैमुरांची खूप काळजी आहे."
VIDEO | Shiv Sena leader Sanjay Nirupam (@sanjaynirupam) in a press conference says, "Today Sanjay Raut said that when Kareena-Saif went to meet PM Modi, they were worried about Taimur. I don't know who gave him his information. But one thing is sure that he is worried about… pic.twitter.com/HHxPWL0v6x
— Press Trust of India (@PTI_News) March 23, 2025
राऊतांचे अतिशय लाजीरवाणे वक्तव्य
निरुपम पुढे म्हणतात, "हिंदूमुळे नागपूरमध्ये दंगल भडकली, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले. त्यांचे हे वक्तव्य अतिशय लाजीरवाणे आहे. मी या वक्तव्याचा निषेध करतो. सर्वांना माहितेय नागपूरमध्ये 17 तारखेला सकाळी हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विरोध प्रदर्शन केले होते. दुपारपर्यंत हे विरोध प्रदर्शन संपले. पण, त्यानंतर सायंकाळी दंगल भडकवण्यात आली. एखाद्या आक्रमणाप्रमाणे हिंदूबहुल भागात दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. या भयंकर दंगलीचा मास्टरमाईंड फईम खानला ताब्यात घेतले आहे. तपासात समोर आले आहे की, त्या फईम खानचा मेंटॉर इंजीनिअर असून, तो सोशल मीडियावर तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय."
मातोश्रीवर औरंगजेबाचा फोटो
"अशा दंगलखोरांना उबाठाचे नेते आणि उद्धव ठाकरे पाठिंबा देतात, हे निषेधार्ह आहे. ज्याप्रकारे नागपूरच्या दंगलीनंतर वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत आणि उबाठा औरंगजेबाची बाजू घेतात. यावरुन वाटते की, येणाऱ्या काळात औरंगजेब उबाठाचे आराध्य दैवत होईल. लवकरच मातोश्रीत बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोशेजारी औरंगजेबाचा फोटो लागेल. औरंगजेबाचे आणि त्याला मानणाऱ्यांचे समर्थन करणे, हे उबाठाचे नवीन धोरण आहे. मुस्लीम मतांसाठी लाचार होऊन हे करत असतील, तर विधानसभेप्रमाणे येणाऱ्या काळातही त्यांना मोठा झटका बसेल," अशी घणाघाती टीका संजय निरुपण यांनी केली.