शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

संजय बर्वे यांना महासंचालकपदी बढती

By admin | Updated: March 15, 2017 04:07 IST

गृह विभागाने राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुुक्त संजय बर्वे यांना महासंचालकपदी बढती दिली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागा

जमीर काझी, मुंबईगृह विभागाने राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुुक्त संजय बर्वे यांना महासंचालकपदी बढती दिली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक पद तसेच ठेवत राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी बर्वे यांची बदली केली आहे. होमगार्डचे उपमहासमादेशक संजय पांडे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे एसीबीची पोस्ट रिक्त ठेवून ‘सिक्युरिटी कार्पोरेशन’चे पद तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत करण्यात आले आहे, असे गृह विभागातील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री उशीरा त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गुप्त वार्ता विभागाचा अतिरिक्त पदभारही बर्वे यांच्याकडेच राहणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया हे सेवाज्येष्ठ असूनही तब्बल सव्वा वर्षे ‘होमगार्ड’मध्ये राहून निवृत्त व्हावे लागले. त्यांना डावलून ‘एसीबी’च्या प्रमुखपदी अन्य दुसऱ्या अधिकाऱ्यांची वर्णी लावता येणे शक्य नसल्यामुळे हे पद रिक्त ठेवून अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला आहे. मारिया हे सेवानिवृत्त झाल्यानंतर महासंचालकाच्या मंजूर सहा पदांपैकी दोन पदे रिक्त झाली होती. त्यापैकी सेवाज्येष्ठतेनुसार १९८६च्या आयपीएस बॅॅचचे अधिकारी एस. पी. यादव यांना चार फेबु्रवारीला विधी व तंत्र विभागाच्या महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांच्याच बॅचच्या संजय पांडे यांची गेल्यावर्षी २९ आॅक्टोंबरला गृह विभागाने विशेष अध्यादेश काढून ९ वर्षांपूर्वी तत्कालिन सरकारने मंजूर केलेला दोन वर्षे आठ महिन्यांचा कालावधी अकार्य दिन (डायस नॉन) केला. त्यामुळे पांडे यांनी आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर राज्य सरकारला याप्रकरणाचा निकाल लागेपर्यंत महासंचालक दर्जाचे एक पद रिक्त ठेवण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले. त्यामुुळे मंजूर सहापैकी एसीबीचे पद रिक्त असल्याने सरकारने मंगळवारी सुरक्षा महामंडळांच्या प्रमुखपदाची पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती करत बर्वे यांची त्यापदावर नियुक्ती केली.