शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 13:57 IST

elecation, punepadwidhar, politics, bjp, sangli पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून आनंद

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.खानापूरचे दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पूत्र संग्रामसिंह यांना यापूर्वी पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी पक्षीय आदेशानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेत विश्वजीत कदम यांच्या निवडीची वाट मोकळी केली होती. संग्रामसिंह देशमुख सध्या जिल्हा बँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले होते. या सर्व कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना दुसऱ्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. देशमुख समथर्कांनी उमेदवारी जाहीर होताच जल्लोष केला.एकाच जिल्ह्यात दोघांना उमेदवारीपुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत काट्याची लढत शक्य आहे. भाजपने सांगली जिल्ह्यातील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही याच जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणाच सांगली जिल्हा हे केंद्र बनणार आहे.

पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे. पक्षाशी व जनतेशी प्रामाणिक राहून काम केल्याचे हे फळ आहे. लोकांसाठी कार्यरत राहण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार आहे. या मतदारसंघात पक्षाची ताकद अबाधित आहे. यश नक्की मिळेल.- संग्रामसिंह देशमुख, सांगली

आमदारकीची परंपरादिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांनी १९९५ मध्ये पतंगराव कदम यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती. संपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांच्याविरोधात विधानसभा पोटनिवडणूक जिंकली होती. त्यांनतर पृथ्वीराज देशमुख यांना भाजपच्या सत्ताकाळात २०१९ मध्ये विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. आता आणखी एकदा उमेदवारी मिळाल्याने देशमुख समथर्कांतून आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPuneपुणेSangliसांगलीSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपा