शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली टपाल विभागाने पटकाविले देशात अव्वल स्थान; एका दिवसात तब्बल १ अब्जांचा उतरवला विमा, राज्यात पहिल्या ५ मध्ये कोणते जिल्हे...वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:07 IST

विमा सेवा वर्धापनदिनानिमित्त देशभर ‘महा लॉगिन डे’ उपक्रम राबविण्यात आला

सांगली : भारतीय टपाल विभागाच्या डाक जीवन विम्याच्या १४२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सांगली टपाल विभागाने दि. २ रोजी विक्रमी कामगिरी केली. एका दिवसात ५,२०२ नागरिकांचा तब्बल १ अब्ज ६६ कोटी रुपयांचा विमा उतरवत ७ कोटी ४१ लाख ८३ हजार ५२१ रुपयांचा विक्रमी हप्ता भरणा करून सांगली विभागाने देशात प्रथम क्रमांक पटकावला.टपाल विभागामार्फत शहरी भागातील कर्मचारी, व्यावसायिक व पदवीधरांसाठी डाक जीवन विमा (पीएलआय), तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण टपाल जीवन विमा योजना राबवली जाते. विमा सेवा वर्धापनदिनानिमित्त देशभर ‘महा लॉगिन डे’ उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत सांगली टपाल विभागाने देशपातळीवर विक्रमी कामगिरी नोंदवली.या यशासाठी मागील काही दिवसांपासून सांगली विभाग तसेच त्या अंतर्गत येणारी सर्व मुख्य व उप टपाल कार्यालये आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने प्रयत्न करत देशात सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशात सर्वाधिक विमा उतरवण्याचा व हप्ता भरणा करण्याचा मान सांगली विभागाने मिळवला. यामुळे महाराष्ट्र सर्कलने एकूण १६.९७ कोटी रुपयांचा हप्ता भरणा करत ८२०.१६ कोटी रुपयांचा विमा उतरवण्याची कामगिरी साध्य केली.

राज्यात पहिल्या पाच टपाल विभागांची कामगिरीविभाग / पॉलिसी संख्या / हप्ता भरणा / विमा रक्कम

  • सांगली / ५२०२ / ७४१८३५२१ / १६६१४३५०००
  • धुळे / १८९० / ७८७१३५० / ७०१३७५०००
  • पुणे / १५०७ / ८४५३९६२ / ६७९११००००
  • पंढरपूर / १३६१ / १४१५१३१५ / ६२९३१००००
  • रत्नागिरी / २७५८ / ११४३६१६० / ५९०४६००००

राज्यांची कामगिरीराज्य / पॉलिसी संख्या / हप्ता भरणा / विमा रक्कम

  • महाराष्ट्र / २२२५१ / १६९६८२५३५ / ८२०१६४५०००
  • कर्नाटक / १३६२० / ९२५६७१५० / ५६३६०९५००६
  • तामिळनाडू / ९९२० / ६०५८७९५६ / ४२४५१३००००
  • ओरिसा / १६२०९ / २८७६६५२९ / ४१९५७८५०००
  • उत्तर प्रदेश / १२५३९ / ६६९६४१९७ / ४०४४९८५००६

टपाल विभागाच्या अन्य सेवेप्रमाणे १४२ वर्षांची परंपरा लाभलेल्या विमा सेवेवर जनतेचा तितकाच विश्वास आहे. जिल्ह्यातील जनतेने विक्रमी हप्ते भरून हा विश्वास अधिक दृढ केला आहे. याच विश्वासाच्या जोरावर सांगली टपाल विभागाने देशात अव्वल कामगिरी बजावली आहे. - अर्जुन इंगळे, प्रवर डाक अधीक्षक, सांगली डाक विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Postal Division Tops Nation in Insurance; Crore Rupees Collected

Web Summary : Sangli Postal Division secured the top rank nationally by collecting ₹1.66 billion in insurance premiums in a single day. Maharashtra led states with ₹820.16 million insurance coverage. Sangli, Dhule, Pune, Pandharpur, and Ratnagiri topped Maharashtra's postal divisions.