शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 09:44 IST

Sangli Crime News: नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आणि कमी गुण मिळाल्याबाबत कारण विचारल्यावर उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या वडिलांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी होऊन या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे.

नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आणि कमी गुण मिळाल्याबाबत कारण विचारल्यावर उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या वडिलांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी होऊन या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत मुलीचे वडील हे स्वत: एका शाळेत शिक्षक आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. साधना धोंडीराम भोसले असं मृत मुलीचं नाव असून, ती बारावीमध्ये शिकत होती.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत साधना ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील रहिवासी होती. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या साधना हिला दहावीमध्ये तब्बल ९२.६० टक्के गुण मिळाले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नीटच्या चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले साधनाचे वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला. ‘’नीटच्या सराव परीक्षेत एवढे कमी गुण कसे काय मिळाले, अशाने तू डॉक्टर कशी होणार?’’ अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा साधनाने ‘’तुम्हालाही कमी गुण मिळायचे, तुम्हीतरी शिकून कुठे कलेक्टर झालात?’’, असं उलट उत्तर वडिलांना दिलं.

साधनाने उलट उत्तर दिल्याने वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला. संतप्त झालेल्या धोंडीराम यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधना हिला बेदम मारहाण केली. तेव्हा त्यांच्या पत्नीने मध्ये पडून त्यांना थांबवले. मात्र काही वेळाने त्यांनी साधना हिला पुन्हा मारहाण केली. एवढंच नाही तर शुक्रवारी रात्रभर ते तिला मारहाण करत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उठून शाळेत योग दिनाच्या कार्यक्रमाला गेले होते. घरी परतल्यावर साधना ही त्यांना बेशुद्धावस्थेत दिसून आली.

त्यानंतर घाबरलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधना हिला सांगली येथील दवाखान्यात उपचारांसाठी नेले. साधना ही बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे सांगत त्यांनी तिला उपचारांसाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपचार घेण्यापूर्वीच साधना हिचा मृत्यू झाला. त्यानंतर साधना हिचं शवविच्छेदन केल्यावर तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेली चौकशी आणि आईने दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षक असलेले वडील धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीEducationशिक्षणDeathमृत्यूNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल