ठेवी वर्ग केल्या प्रकरणात शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:52 IST2025-06-21T10:51:47+5:302025-06-21T10:52:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली -मिरज-कुपवाड महापालिकेच्या विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या २३६ कोटी रुपयांच्या कायम ठेवी मुदतपूर्व काढून ...

Sangli: Commissioner Shubham Gupta Case | ठेवी वर्ग केल्या प्रकरणात शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार

ठेवी वर्ग केल्या प्रकरणात शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या २३६ कोटी रुपयांच्या कायम ठेवी मुदतपूर्व काढून खासगी बँकांमध्ये वर्ग करण्यात आल्याप्रकरणी शासनाकडे अहवाल सादर झाला आहे. यामुळे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यांच्याच काळात हे व्यवहार झाल्याने शासन आता कोणती कारवाई करणार, याकडे तक्रारदारांसह येथील सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या कायम ठेवी पूर्वी कॅनरा बँक, युनियन बँक व बँक ऑफ महाराष्ट्रकडे होत्या. त्यांची मुदत संपलेली नसताना या सर्व ठेवी मोडून खासगी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या. शहर व नागरिक विकास मंचने त्यावर  आक्षेप नोंदविला होता. राष्ट्रीयीकृत बँकांमधील ठेवी मुदतपूर्व मोडल्यामुळे महापालिकेला एक ते दीड टक्के प्री-मॅच्युअर क्लोझर इंटरेस्ट पेनल्टी लागली. यातून ३ ते ४ कोटींचे नुकसान झाले आहे. हा नागरिकांचा कररूपी पैसा असल्याने याबाबत असा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

मुख्य लेखाधिकाऱ्यांचीही ठेवींसंदर्भात चौकशी सुरू
महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अभिजीत मेंगडे यांचीही या ठेवी वर्गप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. ठेवी वर्गचा आदेश नेमका कोणी दिला, ही गोष्ट या चौकशीतून बाहेर येण्याची चिन्हे आहेत. शासन आदेशाचे चुकीचे अर्थ लावून ठेवी वर्ग केल्याची बाब समोर आली असल्याने त्यात तत्कालीन आयुक्तांचीही चौकशी होण्याची चिन्हे आहेत. गुप्ता यांच्या काळात झालेल्या अनेक कारभाराची चौकशी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली होती. 

Web Title: Sangli: Commissioner Shubham Gupta Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.