शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांचा महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला

By admin | Updated: November 11, 2015 02:36 IST

पटवर्धन-कुरोली (ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तीन सदस्यांच्या पथकाला वाळू माफियांनी बेदम मारहाण केली.

पंढरपूर : पटवर्धन-कुरोली (ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तीन सदस्यांच्या पथकाला वाळू माफियांनी बेदम मारहाण केली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. प्रभारी मंडल अधिकारी शंकर माळी, तलाठी निलेश कुंभार, गाडीचालक विजय घाडगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पटवर्धन कुरोली येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार गजानन गुरव यांना मिळताच त्यांनी कारवाईसाठी पथक पाठवून दिले. या पथकाने घटनास्थळी जाऊन वाळू उपसा थांबविला. दरम्यान वाळू उपसा करणारे दादासाहेब चव्हाण, श्रीधर नाईकनवरे, सागर नाईकनवरे, नवनाथ अंकुश नाईकनवरे यांच्यासह अन्य चार जणांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. एवढ्यावर न थांबता पथकातील तीनही सदस्यांना दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ नदी पात्रात दाखल झाले. इतर वाळू चोर वाहने सोडून पळून गेले. ग्रामस्थ जखमी महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले. त्यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.