शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

समृद्धी महामार्ग : ५,२८३ कोटींचा मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 30, 2018 06:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा बनवलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे काम ८६ टक्के पूर्ण झाले

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा बनवलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे काम ८६ टक्के पूर्ण झाले असून त्यापोटी २०,६६६ शेतकºयांना तब्बल ५,२८५.९४ कोटी रुपयांचे वाटपही पूर्ण झाले आहे. उर्वरित १४ टक्के भूसंपादनाचे कामही १५ जुलैच्या आत पूर्ण होणार आहे.‘लोकमत’शी बोलताना एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले, वाशिम, अमरावती, नागपूर या तीन जिल्ह्यांत भूसंपादनाचे काम ९० टक्केपेक्षा जास्त झाले आहे. एकूण १६पैकी १३ मार्गांवरच्या निविदा उघडल्या गेल्या असून तेही काम आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे नागपूरमधील हिंगणा, सेलू तर वाशिममधील करंजा, मंगरुळ, बुलडाण्यातील मेहकर आणि ठाण्यातील शहापूर या चार मार्गांचे प्रशासकीय काम पूर्ण झाले आहे. आता फक्त त्या भागात काम सुरू करण्याचे बाकी आहे, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई समद्धी मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. कोणत्याही परिस्थितीत मार्च २०१९पर्यंत सर्वच्या सर्व १६ ठिकाणी एकाचवेळी काम सुरू झाले पाहिजे यासाठी अधिकाºयांनी काम करावे, अशा स्पष्ट सूचनाच देण्यात आल्याचे ते म्हणाले.आजपर्यंत शासनाची ७३५.२१ हेक्टर आणि वनविभागाची ५५३.५८ हेक्टर अशी एकूण १२८८.७९ हेक्टर जमीन या कामासाठी एमएसआरडीसीने ताब्यात घेतली आहे. यासाठी २०,६६६ शेतकºयांसोबत १०५५९ खरेदीखत करण्याचे कामही पूर्ण झाले आहे.कोठे किती भूसंपादन व किती मिळाला मोबदला?जिल्हा संपादित करायचे संपादित क्षेत्र (हेक्टर) मोबदलाखाजगी क्षेत्र (कोटी रु.)बुलडाणा ११३६.८३ १०००.३६ ६१३.६७औरंगाबाद १२१७.९१ ९३८.०६ ११९०.०८वाशिम ९८८.२५ ९१०.६७ ३९७.३२नाशिक ११०८.२२ ८१३.६९ ८७६.२६अमरावती ७९७.१६ ७२३.१६ २८५.६९वर्धा ६००.६६ ५२१.८७ ३७०.००ठाणे ४९३.१८ ३६३.६४ ५९७.८३जालना ४३४.७१ ३३४.६६ ३७३.०१अहमदनगर ३११.९२ २६४.१४ २८३.४३नागपूर २०२.०३ १८७.४९ २९३.६५

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग