Sambhajiraje Meet Deepak Kesarkar: उदयनराजेंनंतर संभाजीराजे दिपक केसरकरांच्या भेटीला; दोन्ही राजे एकाच दिवशी पुण्यात, 'मिशन' काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:07 IST2022-08-12T15:07:06+5:302022-08-12T15:07:17+5:30
आज आलेल्या इंडिया टुडेच्या सर्वेवर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजून काम सुरु केलेले नाही. एक वर्ष द्या, जर आमच्याविरोधात आठजरी जागा निवडून आल्या तरी आम्ही म्हणू की आम्ही काम करण्यालायक नाही, असे केसरकर म्हणाले.

Sambhajiraje Meet Deepak Kesarkar: उदयनराजेंनंतर संभाजीराजे दिपक केसरकरांच्या भेटीला; दोन्ही राजे एकाच दिवशी पुण्यात, 'मिशन' काय?
संभाजीराजे, उदयनराजे यांच्यासोबत आज भेटीचा योग आला. नाहीतर मला सातारा, कोल्हापूरला जावे लागले असते. दोघांशी पर्यटनावर चर्चा झाल्याचे राज्याचे नवे कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबई पेटली असती, संभाजी राजेंच्या एका शब्दामुळे ते घडले नाही, मी पाहिलेय. मराठा क्रांती मोर्चावेळी आंदोलकांच्या व्यासपीठावर जाण्याची ताकद त्यांच्यातच होती. ते काय स्वत:साठी लढत नाहीत, तर या लोकांसाठी लढत आहेत. त्यांच्या पूर्वजांनी खूप लढाया लढल्या आहेत. विचारांची ताकद, प्रगल्भता शाहू महाराजांकडून मिळाली आहे, असेही केसरकर म्हणाले.
संभाजीराजे राज्यभर दौरे करत आहेत. किल्ल्यांचे संवर्धन करत आहेत. महाराष्ट्राचे जे वैभव आहे ते जगासमोर आले पाहिजे. जयपूरमध्ये पिंक स्टोन आणि कोल्हापूरमध्ये ब्लॅक स्टोन आहे, एवढाच फरक आहे. आपण आपला इतिहास विसरल्यासारखे होईल. इतिहास जपला तर इंग्लंड, फ्रान्ससारखे होईल. जे कोणी राज्याचे पर्यटन मंत्री होतील. मी स्वत: पर्यटन मंत्र्यांकडे संभाजीराजेंसोबत जाईन हे जर पर्यटन झाले, तर हजारो लोकांना रोजगार मिळतील, असे केसरकर म्हणाले.
संभाजीराजेंनी केसरकर पर्यटन मंत्री व्हावेत असा आमचा आग्रह आहे, असे म्हटले.