समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:43 IST2026-04-08T11:41:54+5:302026-04-08T11:43:08+5:30

Samarjit Singh Ghatge News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात गेलेल्या समरजित घाटगे यांची घरवापसी झाली आहे. समरजित घाटगे यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा हाती कमळ घेतलं आहे.

Samarjit Ghatge's return to BJP, a shock to Sharad Pawar group, the equations in Kagal will change | समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार

समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात गेलेल्या समरजितसिंह घाटगे यांची घरवापसी झाली आहे. समरजितसिंह घाटगे यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा हाती कमळ घेतलं आहे. दरम्यान, समरजितसिंह घाटगे हे भाजपात गेल्याने कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच घाटगेंच्या भाजपामधील प्रवेशामुळे कागलमधील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

आज भाजपाच्या कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या गळ्यात भाजपाची शाल घालून त्यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत राजे अखिलेशसिंह घाटगे आणि राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. तसेच कागलमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचाही यावेळी भाजपामध्ये पक्षप्रवेश झाला.

२०२४  साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपात कागल मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सुटल्याने भाजपाकडून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. तसेच त्यांनी कागलमधून हसन मुश्रिफ यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत घाटगे यांना मुश्रिफ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. 

Web Title : समरजितसिंह घाटगे की भाजपा में वापसी, शरद पवार गुट को झटका।

Web Summary : समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार) छोड़कर भाजपा में वापस आ गए। यह कागल में पवार की राकांपा के लिए एक झटका है, जिससे राजनीतिक समीकरण बदल सकते हैं। उन्होंने पिछले चुनाव में हसन मुश्रीफ के खिलाफ चुनाव लड़ा और हार गए।

Web Title : Samarjeetsinh Ghatge returns to BJP, setback for Sharad Pawar group.

Web Summary : Samarjeetsinh Ghatge rejoined BJP after leaving for NCP (Sharad Pawar). This is a setback for Pawar's NCP in Kagal, potentially changing political equations. He contested against Hasan Mushrif in the previous election and lost.