शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
2
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
3
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
4
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
5
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
6
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
7
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
8
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
9
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
10
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
11
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
12
संसदेत बारामतीचे तीन खासदार, सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज; विराेधात कुणीच नाही
13
Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...
14
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
15
'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल
16
सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया
17
१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी
18
येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले
19
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
20
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार

केडीएमसीच्या फायर ब्रिगेड जवानांना सलाम; चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांचा वाचवला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 5:43 PM

एकीकडे मुक्या प्राण्यांना मारहाण करण्याच्या घटनेत वाढ होत असताना  कल्याणात  चेंबरमध्ये पडलेल्या तीन  कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव  केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

एकीकडे मुक्या प्राण्यांना मारहाण करण्याच्या घटनेत वाढ होत असताना  कल्याणात  चेंबरमध्ये पडलेल्या तीन  कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव  केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला आहे.  कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली सोसायटीत आज सकाळी हा प्रकार घडला. यावेळी  अनेक अडचणी येऊनही पिल्लांच्या वारंवार ओरडण्यामुळे अग्नीशमन दलाचे जवानही कासावीस झाले होते. अखेर प्रयत्नांची शिकस्त करत पिल्लांना बाहेर काढले. या तीनही पिल्लांना ड्रेनेज चेंबरमधून बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले. 

वसंत व्हॅली सोसायटीच्या ड्रेनेज चेंबर्समध्ये कुत्र्याचे पिल्लू पडल्याची माहिती रहिवाशांनी केडीएमसीच्या फायर ब्रिगेडला दिली. त्यानूसार  फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली अन पिल्लाना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र चेंबरमधील  जागा अरुंद असल्यामुळे अडचण येत होती. जिवाच्या आकांताने पिल्लंही ओरडत होती. त्यामुळे  जवानांचा जीवही भांड्यात पडला . जवानांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली. चेंबरमध्ये अडकलेल्या या पिल्लाला बाहेर काढण्यास आणखी थोडा जरी वेळ लागला असता तर  इवल्याशा पिल्लांच्या जीवावर बेतले असते अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिकाअग्निशमन दलाच्या विनायक लोखंडे, राहुल भाकरे, निखिल इशाने, युवराज राठोड आदींच्या टीमने ही कामगिरी केली. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाFire Brigadeअग्निशमन दल