शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विक्रीकर वसुली रामभरोसे!

By admin | Updated: August 19, 2016 01:30 IST

आर्थिक उलाढालीत देशात क्रमांक १ चे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून विक्रीकराची वसुली रामभरोसे सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आॅनलाइन रिटर्न बंद असल्याने

- यदु जोशी,  मुंबईआर्थिक उलाढालीत देशात क्रमांक १ चे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून विक्रीकराची वसुली रामभरोसे सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आॅनलाइन रिटर्न बंद असल्याने कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर उदक सोडण्याची पाळी सरकारवर आली आहे.आॅनलाइन पद्धत ३१ मार्च २०१६ पासून बंद करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. रिटर्नच भरले जात नसल्याने व्यापाऱ्यांकडे नेमके किती रुपयांचे करदायित्व आहे हे कळायला मार्ग नाही. व्यापारी भरतील तो कर गोड मानून घेतला जात आहे. गेल्या वर्षी तुम्ही किती कर भरला होता त्या अनुषंगाने भरा, असे आम्हाला सांगितले जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्याच्या महसुलात विक्रीकराचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या वर्षी ७९ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न या कराद्वारे राज्य शासनास मिळाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९० हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. विक्रीकर आॅफलाइन भरला जात नाही. पाच महिन्यांपासून रिटर्न भरण्याची आॅनलाइन यंत्रणा बंद आहे. यदा कदाचित ती उद्या सुरू झाली तरी करदायित्व निश्चित करून त्याची वसुली करण्याचे जिकिरीचे काम विभागाला करावे लागणार आहे. त्याचवेळी जीएसटी राज्यात येऊ घातला आहे. अशा परिस्थितीत विक्रीकराचा डोलारा कोसळणे राज्याला परवडणारे नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर रिटर्न भरले जात नसले तरी करभरणा व्यवस्थित सुरू असल्याचा दावा विक्रीकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. जुनी बंद, नवीन पद्धत येईना!‘सॅप’ आधारित कर महसूल व्यवस्थापन (टीआरएम) पद्धत विक्रीकर विभागात आणण्याचे कंत्राट एनआयआयटी कंपनीला वर्षभरापूर्वी देण्यात आले होते. मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात कंपनीला अद्यापही यश आलेले नाही. त्यासाठी कंपनीवर कुठली कारवाई करणार, असा प्रश्न आहे.नवीन पद्धत लागू करण्यास विलंब झाला आहे. मात्र, आता तिचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दहा दिवसांत ती सुरू होईल. त्यानंतर विक्रीकराचे रिटर्न भरण्याचे काम पूर्ववत होईल. नवीन पद्धत अधिक गतिमान, पारदर्शक असेल. प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत.- राजीव जलोटा, विक्रीकर आयुक्त

सामोरे जाताना आॅनलाइन रिटर्नबाबत विक्रीकर विभागाची अशी उदासीनता चांगली नाहीच. व्यापाऱ्यांना कर भरायला विलंब झाला की सरकार दंड करते. रिटर्नची नवीन आॅनलाइन पद्धत आणण्यात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्यांविरुद्धही कारवाई करावी. सरकारचा खजिना भरणाऱ्या व्यापारी वर्गाबाबत सरकारचा दृष्टिकोन योग्य नाही. - बी. सी. भरतिया, अध्यक्ष, कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स