शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकालानंतर मद्य विक्रीला मुभा

By admin | Updated: February 20, 2017 18:44 IST

परवानाधारक व्यावसायिकांना महानगरपालिका निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर मद्य विक्री करण्यास मुभा

ऑनलाइन लोकमत

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी परवानाधारक व्यावसायिकांना महानगरपालिका निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर मद्य विक्री करण्यास मुभा दिली आहे.२१ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेची निवडणूक असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजनी होणार आहे. परिणामी १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून २०, २१ व २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवण्यास सांगितले होते. याविरुद्ध महाराष्ट्र वाईन मर्चन्टस् असोसिएशनने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता परवानाधारक मद्य विक्रेत्यांना अंतरिम दिलासा देऊन शासनाला यावर ४ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.याचिकाकर्ते नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रांतर्गत व्यवसाय करतात. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे राज्यातील अन्य काही जिल्हाधिकाऱ्यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्री बंदीचे आदेश जारी केले असून बंदीच्या कालावधीत समानता नाही. बंदी लागू करताना सारासार विचार करण्यात आला नाही. मद्य विक्री व्यवसाय करण्यासाठी शासनाला मोठ्या रकमेचे शुल्क द्यावे लागते. त्यामुळे एक दिवसही व्यवसाय बंद ठेवल्यास व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागतो असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्याम देवानी व अ‍ॅड. कैलाश दोडानी यांनी काम पाहिले.