शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 12:19 IST

प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार सामाजिक बांधिलकी जोपासून या लढ्यात खारीचा वाटा उचलावा....

ठळक मुद्देएक लाख एकवीस हजार रुपयांचा धनादेश वसई तहसीलदारांकडे सुपूर्दप्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मदतीचा हात दिल्यास हा लढा एकत्रितपणे लढणे सोपे होईल

पुणे /वसई : आपला भारत देश आज कोरोना विषाणू संसर्गाशी लढत आहे. महाराष्ट्र सरकारही फार चांगल्या रीतीने कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, या भावनेतून साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी एक लाख एकवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वसई तहसीलदारांकडे सुपूर्द केला. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार सामाजिक बांधिलकी जोपासून या लढ्यात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.

अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीदिनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारातील रक्कमेच्या माध्यमातून कोरोनाविरोधातील लढाईत मदतीचा हात पुढे केला. प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे फादर दिब्रिटो यांच्या विनंतीला मान देऊन वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी मंडळ अधिकारी कुमार होगडे यांना फादर यांच्या घरी पाठवून धनादेश स्वीकारला.

याबाबत फादर दिब्रिटो म्हणाले, 'सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्रात दररोज रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. नागरिक म्हणून सद्यस्थितीत प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे सरकारच्या मदतीसाठी उभे ठाकले पाहिजे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये खारीचा वाटा उचलल्यास शासनाच्या माध्यमातून सर्व यंत्रणा या संकटाचा अधिक सक्षमपणे सामना करू शकतील. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आणि राज्याचा एक नागरिक म्हणून मी मला मिळालेल्या पुरस्कारातील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तहसीलदारांकडे सुपूर्द करत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मदतीचा हात दिल्यास हा लढा एकत्रितपणे लढणे सोपे होईल आणि वैद्यकीय सुविधा सुधारण्यास सुरुवात होईल.' 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधी