शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 14:31 IST

  पोलीस कोठडी संपत असल्याने अंदुरे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत.

पुणे :  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणाचा सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांकडे एकाच वेळी तपास करायचा असल्याने अंदुरे याच्या कोठडीत वाढ करण्याची गुन्हे अन्वेषण विभागाची मागणी मान्य करत न्यायालयाने त्याला 1 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. एस सय्यद यांनी हा आदेश दिला.

        पोलीस कोठडी संपत असल्याने अंदुरे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कळसकर याच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. कळसकर आणि अंदुरे याचा एकत्रित तपास करायचा असल्याने अंदुरे याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील जयकुमार ढाकणे यांनी केली.

       बचाव पक्षाच्या वतीने धरमराज यांनी युक्तिवाद केला, चार दिवसाच्या कोठडीत कोणताही तपास झालेला नाही. कळसकर याला 3 सप्टेंबर पर्यंत एटीएसची कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे अंदुरे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यास बरोबर तपास करण्याचा उद्देश साध्य होणार नाही. त्यामुळे पोलीस कोठडी ऐवजी अंदुरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, अशी विनंती adv धरमराज यांनी केली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने अंदुरे याला एक तारखेपर्यंत कोठडी सुनावली.

आधी युक्तिवाद मग वकीलपत्र

या प्रकरणात या पूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये बचाव पक्षाच्या वतीने adv प्रशांत कर साळशिंगीकर यांनी युक्तिवाद केला मात्र काही कारणास्तव ते आज न्यायालयात येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या ऐवजी ऍड धरमराज यांनी बचाव पक्षाची भूमिका मांडली. वकील बदली झाल्यानंतर युक्तिवाद करणाऱ्या वकिलाने पक्षकाराचे वकीलपत्र घेणे अपेक्षित आहे मात्र धरम राज ज्यांनी वकील पत्र न घेताच युक्तिवाद केला ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर धरमराज यांनी अंदुरे याच्या वकीत्रापत्रावर सह्या घेतल्या.

 

तिघांना गुरुवारी हजर करणार

गौरी लंकेश प्रकरणात अटक केलेल्या तिघांचा दाभोलकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सीबीआय अटक करून त्यांना शुक्रवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करणार आहे. यामध्ये अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर  या तिघांचा समावेश आहे. तिघांकडून महत्वाचे धागेदोरे  सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखूनCBIगुन्हा अन्वेषण विभाग