रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:10 IST2025-11-10T15:09:40+5:302025-11-10T15:10:56+5:30
Ajit Pawar NCP: गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाने धक्का दिला.

रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
Rupali Thombre Patil Amol Mitkari: रुपाली चाकणकरांना घेरणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाने स्पष्ट मेसेज दिला. तर अमोल मिटकरी यांनाही अजित पवारांनी धक्का दिला. पुण्यातील रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्त्यांची नवीन नावे जाहीर केली आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. यात नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, वादामुळे चर्चेत आलेले सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की, 'आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.'
'ही नियुक्ती पक्षाच्या सशक्त संघटनात्मक रचनेत एक महत्त्वाचा टप्पा असून, राज्यभरात पक्षाची विकासाभिमुख विचारधारा प्रभावीपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही पावले अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सर्व नवनियुक्त प्रवक्त्यांकडून पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामांन्यांपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने नवी प्रवक्त्यांची घोषणा केली.
चाकणकरांचा ठोंबरेंना शह
फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला होता. या प्रकरणात रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचाही विषय काढला होता.
दोन्ही नेत्यांच्या भांडणात रुपाली चाकणकरांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना शह दिल्याची चर्चा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली असतानाच त्यांची प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे.
दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमोल मिटकरींनी भाजपविरोधात थेट भूमिका घेतली जात आहेत. ते सातत्याने भाजपला लक्ष्य करत असल्याने त्यांना प्रवक्तेपदावरून दूर केल्याची चर्चा आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांच्या… pic.twitter.com/vsC3AoXOLt
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) November 10, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रवक्ते कोण?
आमदार अनिल पाटील
आमदार चेतन तुपे
आमदार सना मलिक
हेमलता पाटील
राजीव साबळे
सायली दळवी
रुपाली चाकणकर
आनंद परांजपे
राजलक्ष्मी भोसले
प्रतिभा शिंदे
प्रशांत पवार
शशिकांत तरंगे
ब्रिजमोहन श्रीवास्तव
अविनाश आदिक
सुरज चव्हाण
विकास पासलकर
श्याम सनेर