'सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही'; चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 14:58 IST2020-02-02T14:54:11+5:302020-02-02T14:58:06+5:30

बोलताना जरा भान ठेवा आणि काही वक्तव्य करताना जबाबदारीने करा, असं म्हणत चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं.

rupali chakankar criticize babanrao lonikar | 'सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही'; चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं

'सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही'; चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं

मुंबई : माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बबनराव लोणीकर हे महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लोणीकरांचा चांगलाच समाचार घेतला.

जीजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच. याची काळजी तुम्ही करु नका, पण तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साप करायला आम्हाला वेळ लागणार नाही.सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही. त्यामुळे बोलताना जरा भान ठेवा आणि काही वक्तव्य करताना जबाबदारीने करा, असं म्हणत चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं.

तर पक्ष कोणताही असला तरीही राजकीय नेत्यांनी भाषण करातांनी शब्दांचा वापर मोजून मापून केला पाहिजे. लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा मी समर्थन करणार नाही. तसेच त्यांनी केलेले विधान हे आक्षेपार्हचं असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.

 

 

Web Title: rupali chakankar criticize babanrao lonikar