शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया पहिल्याच दिवशी फसली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:45 IST

राज्यभरातील ९ हजार शाळांमधील पहिल्या सव्वा लाख जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

ठळक मुद्देसंकेतस्थळावरून भरता येईना अर्ज : पालकांना मनस्ताप, चिंता वाढली मागील वर्षी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी महिन्यातच सुरू आरटीई प्रवेशाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीच्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रिया पहिल्याच दिवशी फसली आहे. मंगळवारी पालकांनी आरटीईच्या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अर्जच भरता आले नाहीत. त्यामुळे पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.राज्यभरातील ९ हजार शाळांमधील पहिल्या सव्वा लाख जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करीत असलेल्या पालकांनी त्यानुसार मंगळवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अर्ज भरता आलेले नाहीत. राज्यभरातील अनेक जिल्हयांमध्ये हीच परिस्थिती राहिली.  आरटीई प्रवेश अर्ज भरताना पालक राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता गुगल मॅपवर दर्शवायचा आहे. मात्र गुगलच्या बदलेल्या धोरणानुसार आता गुगल मॅपचा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. शिक्षण विभागाने त्याचे पैसे भरले नसल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यात पहिल्या दिवशी अडचणी आल्याचे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले. संकेतस्थळावरून अर्ज भरण्यास पालकांना असंख्य अडचणी येत असतानाही शिक्षण विभागाकडून तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरता येत नसल्याबाबत पालकांना काहीच माहिती दिली नाही. मागील वर्षी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी महिन्यातच सुरू करण्यात आली होती, मात्र यंदा त्यास दोन महिने विलंब झाला आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉटरी पध्दतीने आरटीईच्या फेºया पूर्ण होण्यास दोन ते महिने लागण्याची शक्यता आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश न मिळल्यास पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठया त्रासाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे किमान आता तरी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया लवकर मार्गी लागण्याची मागणी पालकांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारEducationशिक्षणSchoolशाळाonlineऑनलाइन