एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:09 AM2019-05-06T05:09:51+5:302019-05-06T05:10:09+5:30

राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते.

 Rs 3,607 crore of FRP is exhausted | एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत

एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत

Next

पुणे  -  राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यातील १८ हजार ८२१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. राज्यातील शेतकºयांची एफआरपी ३ हजार ६०७ कोटी रुपये रक्कम अजूनही थकीत आहे, असे साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, एप्रिलअखेरीस राज्यातील साखर कारखान्यांनी ९४९ लाख टन एवढ्या उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यावर देय असलेल्या एफआरपीच्या रक्कमेपैकी ८५ टक्के रक्कम एप्रिल अखेरीस शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. मात्र,अद्यापही राज्यातील शेतकºयांची ३ हजार ६०७ कोटी एफआरपीची रक्कम थकित आहे. शेतकºयांना ही रक्कम तत्काळ मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या सॉफ्टलोन योजनेतून राज्यातील कारखान्यांना कर्ज मंजूर झाले आहे. कर्जाची रक्कम मिळताच थकीत एफआरपी आणखी कमी होईल.
एप्रिल अखेरपर्यंत उसाच्या एफआरपीची शंभर टक्के रक्कम ४३ साखर कारखान्यांनी शेतकºयांना दिली आहे. तसेच ८० टक्क्यांहून अधिक रक्कम देणाºया कारखान्यांची संख्या ८० असून, ४२ कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के एवढी रक्कम शेतकºयांना दिली आहे. त्याचप्रमाणे शून्य ते ६० टक्क्यापर्यंत एफआरपी देणाºया कारखान्यांची संख्या ३० एवढी आहे.

सुमारे १५ दिवसांपूर्वी शेतकºयांना एफआरपीचे चार हजार ३२४ कोटी रुपये देणे बाकी होते. त्यातील काही कारखान्यांनी शेतकºयांच्या बँक खात्यावर ७१७ कोटी रुपये जमा केले आहेत. २०१८-१९ या उस गाळप हंगाम मध्ये प्रथमच एफआरपीचा देय आकडा चार हजार कोटी रुपयांच्या खाली आला आहे, असेही शेखर गायकवाड यांनी सांगितले.

Web Title:  Rs 3,607 crore of FRP is exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.