शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या खोलीत सचिवपुत्राचा बेधडक प्रवेश

By admin | Updated: December 26, 2014 00:44 IST

तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या कक्षात सचिव श्रीराम गोसावी यांचा पुत्र बेधडक प्रवेश करायचा. मुलींच्या गळ्यात हात घालायचा. या गंभीर प्रकाराची तक्रार बालगृहातीलच मुलींनी सचिव

गोसावींची दुसरी पिढीही : वडील म्हणाले, 'त्याची तक्रार अधीक्षकांकडे करा, मी सचिव!'गणेश देशमुख - अमरावतीतपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या कक्षात सचिव श्रीराम गोसावी यांचा पुत्र बेधडक प्रवेश करायचा. मुलींच्या गळ्यात हात घालायचा. या गंभीर प्रकाराची तक्रार बालगृहातीलच मुलींनी सचिव श्रीराम गोसावी यांच्याकडे केली होती; तथापि अधीक्षकांकडे तक्रार करा. मी सचिव आहे, असा अफलातून सल्ला त्यांनी मुलींना दिला होता. त्याग अन् सेवाभावाची भूमी असलेल्या तपोवनात कार्यरत असणाऱ्यांची मानसिकता बघा! पुत्राच्या अश्लील वागणुकीची तक्रार केल्यानंतरही सचिवांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. ज्या अधीक्षकांकडे तक्रार करण्यास मुलींना गोसावींनी सांगितले ते गजानन चुटे असल्या अनैतिक आणि नियमबाह्य बाबींना बळ देणारेच होते. मुलींच्या तक्रारी दडपण्यासाठीच ते सर्व मुलींमध्ये ओळखले जायचे. चुटेला याच कारणासाठी पोलिसांनी अटकही केली. गोसावीच्या मुलाचा असा प्रकार ज्या मुलींना खपत नव्हता त्यापैकी मोजक्या मुलींनी प्रशासक असलेल्या अजय लहाने यांच्याकडे तक्रार केली होती. इतक्या गंभीर प्रकरणाची तक्रार झाल्यावर लहाने यांनी खडबडून जागे व्हायला हवे होते. तातडीने या प्रकाराची स्वत:च्या पातळीवर चौकशी करायला हवी होती. इतकेच नव्हे, तर गोपनीय पद्धतीने माहिती घ्यायला हवी होती. परगावी राहणाऱ्या गोसावीच्या मुलाचा बालगृहाशी काय संबंध? तो बालगृहात येतो कसा? त्याचे मित्र बालगृहात कुण्या अधिकाराने शिरतात? तो मुलींच्या खोलीत प्रवेश करतोच कसा? या मुद्यांची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती. अधीक्षक गजानन चुटे, श्रीराम गोसावी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लहाने यांनी पोलीस तक्रार नोंदवायला हवी होती. प्रशासकाचे हेच कर्तव्य ठरते. 'केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन अ‍ॅक्ट' अंतर्गत बालगृहातील मुली सुरक्षित रहाव्यात यासाठीच लहाने यांनी नियुक्ती करण्यात आली आहे; तथापि, वर्षभरापूर्वीच्या या प्रकारानंतरही लहाने यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी कुठलेही पाऊल उचलले नाही.