शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
2
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
3
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
4
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
5
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
6
Piaggio ने आणली नवीन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर! 'आपे ई-सिटी अल्ट्रा' आणि 'आपे ई-सिटी FX मॅक्स', किंमत आणि फीचर्स काय?
7
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
8
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
9
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
10
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
11
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
12
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
13
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
14
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
15
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
16
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 
17
Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले
18
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
19
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
20
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."

इसवी सन पूर्वकाळात कोकणातून भारतात आले रोमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 18:38 IST

History Kolhapur Rom : इसवी सन पूर्वकाळात रोमन भारतात व्यापारासाठी आले होते, याचा नाणेघाटातील शिलालेख उपलब्ध होता; परंतु त्यांनी कोकणातून भारतात प्रवेश केल्याचे आणि तेथून ते सर्व भारतभर पसरल्याचे नवे संशोधन सांगली जिल्ह्यातील कुरळपचे युवा संशोधक सचिन भगवान पाटील यांनी केले आहे. रोमन व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक मागे ठेवलेल्या दिशादर्शक दगडी चक्रव्यूहाच्या चिन्हांमुळे नवा पुरातत्वीय शोध उजेडात आला आहे.

ठळक मुद्देइसवी सन पूर्वकाळात कोकणातून भारतात आले रोमनसांगलीच्या युवकाचे पुरातत्वीय संशोधन : चार दगडी चक्रव्यूहाने दिले पुरावे

संदीप आडनाईककोल्हापूर : इसवी सन पूर्वकाळात रोमन भारतात व्यापारासाठी आले होते, याचा नाणेघाटातील शिलालेख उपलब्ध होता; परंतु त्यांनी कोकणातून भारतात प्रवेश केल्याचे आणि तेथून ते सर्व भारतभर पसरल्याचे नवे संशोधन सांगली जिल्ह्यातील कुरळपचे युवा संशोधक सचिन भगवान पाटील यांनी केले आहे. रोमन व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक मागे ठेवलेल्या दिशादर्शक दगडी चक्रव्यूहाच्या चिन्हांमुळे नवा पुरातत्वीय शोध उजेडात आला आहे.रोमशी संबंध दृढ करणारी चार दगडी चक्रव्यूहे त्यांना सांगली जिल्ह्यात आढळली आहेत. ढेंगेवाडी, ऐतवडे बुद्रुक आणि वशी येथे तीन (ता. वाळवा), तर मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे एक, अशा या चार दगडी चक्रव्यूहांचा त्यांनी अभ्यास करून त्यावर सादर केलेल्या या आठ पानी पुरातत्वीय शोधनिबंधाला शुक्रवारी लंडनच्या केर्डोरिया "CAERDROIA" The Journal of Maze and Labyrinth या मासिकाच्या पहिल्या पानावर स्थान मिळाले आहे.सचिन पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून चक्रव्यूह व त्याच्या भारतातील पुरातन रचना, तसेच या संरचनेचा महाराष्ट्रातील अवशेष व इसवी सनपूर्व इंडो-रोमन व्यापारीसंबंध या अनुषंगाने अभ्यास करीत आहेत. रोमन चलन क्रेट क्वाइनवर ही चक्रव्यूह मुद्रा आजही आढळते.या पाऊलखुणा जपण्याची गरजदरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील मानोली, गजापूरजवळील रानातही याच प्रकारचे उद्‌ध्वस्त चक्रव्यूह आढळले असून, बॉक्साइडचे उत्खनन, रिसॉर्टसाठी, तसेच रत्नागिरीहून येणाऱ्या गॅस पाइपलाइनसाठी या पुरातत्वीय पाऊलखुणा जेसीबीच्या साहाय्याने नष्ट झाल्याचा दुर्दैवी प्रकार उघड झाला आहे. अशाच पाऊलखुणा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही आहेत, त्या पुढील जागतिक संशोधनासाठी जपण्याची गरज आहे.रोमन-पश्चिम महाराष्ट्र व्यापाराचा नवा संदर्भया नव्या संशोधनामुळे रोमन पश्चिम महाराष्ट्रातून विशेषत: भारतात व्यापारासाठी प्रवेश करत होते, हा नवा संदर्भ उजेडात आला आहे. ते सातवाहन काळात समुद्रमार्गे भारतात आले आणि त्यांनी पठारी प्रदेशात येताना दिशादर्शक म्हणून या काही दगडी चक्रव्यूह रचना मांडल्या. यापूर्वी प्रो. सांकरिया यांच्या कोल्हापुरातील ब्रह्मपुरीतील उत्खननातील संदर्भ याला पूरक आहेत. या उत्खननात आढळलेली रोमन समुद्रदेवता पोसायडनची मूर्ती आजही कोल्हापूरच्या टाउन बागेतील पुरातत्व संग्रहालयात आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी दिली आहे. 

इसवी सनपूर्व इंडो-रोमन व्यापारी संबंध यामुळे प्रकाशात आले आहेत. रोमन समुद्रमार्गे भारतात आले आणि कोकणातून नागपूरपर्यंतच्या पठारी भागात व्यापारासाठी पसरले. त्यामुळे त्यांनी दिशादर्शक म्हणून ही चक्रव्यूहाची रचना केली. जगाच्या दृष्टीने हे नवे संशोधन आहे. या परिसरातील लोकांनी अशा जुन्या पाऊलखुणा नष्ट करू नयेत.-डॉ. पी.डी. साबळे, विभागप्रमुख, पुरातत्व शाखाडेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट अँड डिमंड युनिव्हर्सिटी, येरवडा, पुणे

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणkolhapurकोल्हापूरhistoryइतिहासPuneपुणेSangliसांगली