भूमिका चावला यांच्या मातोश्रींचे ह्रदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 21:14 IST2018-07-15T21:12:57+5:302018-07-15T21:14:45+5:30

Role of Chawla's Matoshri passed away from heart attack. | भूमिका चावला यांच्या मातोश्रींचे ह्रदयविकाराने निधन

भूमिका चावला यांच्या मातोश्रींचे ह्रदयविकाराने निधन

ठळक मुद्दे संसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारनाशिकमध्ये दहा ते पंधरा वर्षांपासून चावला कुटुंबिय राहत आहे.

नाशिक : देवळाली कॅम्प येथील संसरीनाका येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सिने अभिनेत्री भुमिका उर्फ रचना चावला याच्या मातोश्री बाली ए चावला (६५) यांचे ह्रदयविकाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात संसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, त्यांचे पती सेवानिवृत्त कर्नल ए. एस. चावला, सिनेअभिनेत्री भूमिका चावला यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. हे पंजाबी कुटुंब असून चावला हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर नाशिकमध्ये स्थायिक झाले. २००७ साली भूमिकाचा नाशिकमधील देवळाली येथील गुरूद्वारामध्ये विवाह झाला होता. नाशिकमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांपासून चावला कुटुंबिय राहत आहे. भूमिका यांच्या मातोश्रींच्या निधनाने अवघ्या सिनेसृष्टीसह संसरी, देवळाली गावात शोककळा पसरली आहे. संसरी गावातील स्मशानभूमित चावला यांच्या पार्थिवावर संध्याकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Role of Chawla's Matoshri passed away from heart attack.