शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

नोकरशहांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: October 4, 2015 00:59 IST

महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावे, येथील उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

- प्रवीण तापडिया (लेखक विदर्भ इंडस्ट्रीज असोसिशनचे माजी अध्यक्ष आहेत.) महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावे, येथील उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आणि हे करीत असताना सरकारचा हेतू अथवा प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचे काही कारण नाही. त्यामुळे भविष्यकाळात महाराष्ट्र उद्योगप्रिय राज्यांच्या क्रमवारीत निश्चित प्रथम स्थान प्राप्त करू शकेल, असा विश्वास आहे. परंतु हे यशोशिखर गाठण्याकरिता गरज आहे ती नोकरशाहीची मानसिकता बदलण्याची. कारण उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे हे काही एकट्यादुकट्या व्यक्तीचे काम नाही, तर ती एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक घटकाने अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून याचा विचार करायला हवा. उद्योग आणि उद्योजकांसाठी सुकर परिस्थिती आपल्या राज्यातही निर्माण होऊ शकते. गरज आहे ती केवळ अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीची. बहुतांश अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता आणि अधिकारशाही उद्योगांच्या प्रगतीतील अडसर ठरत आहे. त्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. साधा इमारतीचा नकाशा मंजूर करून घ्यायलाही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागते. गेल्या १५ ते २० वर्षांपासून या विभागांमध्ये अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराची दलदल निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे ही दलदलही साफ करण्याची आवश्यकता आहे. बरेचदा उद्योग सुरू करण्यास इच्छुक लोक कुठलाही धोका पत्करायला तयार नसतात. प्रत्येक गोष्ट आपोआप मिळणार नाही. त्यासाठी कठोर परिश्रमांची गरज असते. प्रामुख्याने स्टार्टअप्ससाठी दर्जेदार सेवा प्राधान्यक्रमावर असणे गरजेचे आहे. संकल्पना, अंमलबजावणीची क्षमता, आवड व निर्धार असल्यास या जगात अशक्य काहीच नाही.