रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? कंपनीत गैरव्यवहार झाल्याची ईडीकडे तक्रार; चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 07:13 IST2022-08-28T07:11:43+5:302022-08-28T07:13:17+5:30

Rohit Pawar: राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून, यासंदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Rohit Pawar's problems will increase? Complaint to ED about malpractice in company; There will be an inquiry | रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? कंपनीत गैरव्यवहार झाल्याची ईडीकडे तक्रार; चौकशी होणार

रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? कंपनीत गैरव्यवहार झाल्याची ईडीकडे तक्रार; चौकशी होणार

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून, यासंदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून, त्यात जर काही तथ्य आढळले तर या चौकशीचे धागे रोहित यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा. लि. या कंपनीमध्ये ते सन २००६ ते २०१२ पर्यंत संचालक होते. त्यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील या कंपनीमध्ये २००६ ते २००९ मध्ये संचालक होते. तसेच या कंपनीशी येस बँक-डीएचएफएल घोटाळाप्रकरणी अटकेतील राकेश व सारंग वाधवान यांचाही जवळचा संबंध असल्याचे समजते. मात्र, वाधवान बंधूंचे नाव घोटाळ्यात आल्यानंतर रोहित यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. 
 

Web Title: Rohit Pawar's problems will increase? Complaint to ED about malpractice in company; There will be an inquiry