शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्याला हादरवून सोडणारा खुलासा येत्या दोन दिवसांत करणार - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:46 IST

गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. मविआ नेते सध्या वेगवेगळ्या मुद्यावरून महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी मतदारांना आवाहन करताना पाहिजे तेवढा निधी देतो, पण ईव्हीएमचे बटण कचाकच दाबा, असे आवाहन केले होते. मात्र प्रत्यक्षात सरकारकडे निधीचीच कमतरता असल्याचे समोर आले आहे. 

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पत्र शेअर करत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे.  तसेच, याबाबत येत्या दोन दिवसांत मोठा खुलासा करणार, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले हे कसे दाखवावे, या विवंचनेतून सत्ताधारी आमदारांना येणाऱ्या अधिवेशनात भरीव निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण निधी देणार कुठून? हा प्रश्न अर्थमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांची फाइल ज्यांच्या सहीने मंजूर होते, त्या गृहमंत्र्यांना पडतो की नाही? असा सवाल करत सरकारच्या याच उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत निधीचा खडखडाट झाला असून यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाची 20 हजार कोटींची बिले अद्यापही थकीत आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

सरकार बिले देत नसल्याने तर राज्यातली बहुतांश कामेही थांबली आहे, अशी स्थिती असताना आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना, आमदारांना खूष करण्यासाठी नवीन कामांना निधी देण्याचा घाट घातला जात आहे का? यासाठी पुन्हा नव्याने हजारो कोटी रुपयांची कर्जे काढली जातील. हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही, मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल, हे मात्र नक्की आहे. यासंदर्भात राज्याची तिजोरी कुरतडणारा. राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार असल्याचा इशारा सुद्धा रोहित पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे