शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 20:12 IST

'अजूनही वेळ गेलेली नाही, अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत येऊ शकतात.'

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासून शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवार गटाचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. यातच आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. जळगावमध्ये बोलताना रोहित पवारांनी मराठा आरक्षणावरही आपली प्रतिक्रिया दिली.    

अजून वेळ गेली नाही...रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गट शरद पवार यांचा फोटो वापरतात, कारण त्यांना माहित आहे की, साहेबांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. ज्यांना मंत्रिपदे मिळाली, सत्तेत गेले, ते कदाचित साहेबांना विसरले असतील, पण अनेक आमदार हे साहेबांना विसरलेले नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही, अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत येऊ शकतात, असं रोहित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, चिन्ह असले काय आणि नसले काय, पवार साहेबांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर, लोकांना विश्वासात घेऊन, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांचा अंहकार संपविल्या शिवाय राहणार नाही. भाजपच्या सत्तेत जाणाऱ्या नेत्यांनी स्वार्थासाठी आपली भूमिका बदलली, यावरून लोकांनी विचार करावा की, कोणावर विश्वास ठेवायचा.

...तर आम्ही त्यांना मानूकुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता, सरकारने मराठा आणि धनगर समजाला आरक्षण देण्याची हिंमत दाखवावी. तीन छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल त्यांच्या दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी. केंद्राच्या अधिवेशनात धनगर समाजाचा तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुद्दा जर हे त्रिकूट सरकार मांडू शकत असेल तर आम्ही त्यांना मानू, असंही ते म्हणाले

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRohit Patilरोहित पाटिलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण