मुंबई : अजित पवार विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी आता थेट मुख्य वैमानिकाच्या चारित्र्यावर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जे पायलट हे विमान उडवणारच नव्हते, ते ऐनवेळी कॉकपिटमध्ये कसे आले? आणि त्यांची 'ब्रेथ अनालायझर' चाचणी झाली होती का?" असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले आहेत.
रोहित पवारांच्या दाव्यानुसार, सुरुवातीला 'मदन' नावाचे वैमानिक हे विमान उडवणार होते. मात्र, ऐनवेळी सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे दोन वैमानिक आले. "आधीचे दोन वैमानिक सकाळी साडे सहा वाजता ट्रॅफिकमध्ये अडकले होते, असे सांगितले जाते. पण ते खरंच ट्रॅफिकमध्ये होते का? त्यांचा सीडीआर (CDR) आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासले का?" असा सवाल त्यांनी केला.
सर्वात खळबळजनक दावा करताना रोहित पवार म्हणाले की, "मुख्य पायलट सुमित कपूर हे हाँगकाँगवरून आले होते. त्यांना दारूचे व्यसन होते आणि अमेरिकेत प्रशिक्षणादरम्यान तसेच इतर कमर्शियल फ्लाईट्समध्ये त्यांना दारू पिऊन विमान उडवताना पकडण्यात आले होते. खासगी विमानांच्या बाबतीत नियम शिथिल असल्याने त्यांची तपासणी झाली नव्हती का? माझ्या घरचा माणूस गेला आहे, त्यामुळे मला हे बोलावं लागतंय. सुमित कुमार यांच्या कुटुंबाला वाईट वाटेल, परंतू मला हे बोलावेच लागेल ", असे रोहित पवार यांनी म्हटले.
मोठ्या नेत्याचा धक्कादायक अनुभवअजित पवारांच्या निधनानंतर सांत्वनासाठी आलेल्या एका मोठ्या नेत्याने रोहित पवारांना सांगितले की, "हाच पायलट माझे विमान नांदेडला घेऊन जात होता, तेव्हा त्याने ज्या पद्धतीने लँडिंग केले ते अत्यंत भयानक होते. मी त्याबाबत व्हीएसआर कंपनीकडे तक्रारही केली होती."
उशिरा उड्डाणाचे गूढदादा नेहमी वेळेच्या आधी पोहोचायचे, मग सकाळी ७ वाजता निघणारे विमान ८.१० ला का निघाले? ७० मिनिटांचा हा विलंब कोणामुळे झाला आणि त्या काळात विमानासोबत किंवा वैमानिकांसोबत काही घडले होते का? या दिशेने तपास करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे.
Web Summary : Rohit Pawar raised concerns about pilot Sumit Kapoor's past, alleging alcohol issues and questioning delayed flight departure. A leader revealed a scary landing by the same pilot.
Web Summary : रोहित पवार ने पायलट सुमित कपूर के अतीत पर सवाल उठाए, शराब के मुद्दे का आरोप लगाया और उड़ान में देरी पर प्रश्नचिन्ह लगाया। एक नेता ने उसी पायलट द्वारा डरावनी लैंडिंग का खुलासा किया।