पुणे/मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात अत्यंत खळबळजनक खुलासे केले आहेत. "हा केवळ अपघात नसून घातपाताची शक्यता आहे," असे संकेत देत त्यांनी विमानाची तांत्रिक स्थिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
रोहित पवार यांच्या मते, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रणामुळे या अपघाताचे गांभीर्य समोर आले आहे. "जर हे फुटेज नसते तर हा एक सामान्य अपघात म्हणून दुर्लक्षित केला गेला असता. एका प्रत्यक्षदर्शी महिलेच्या सांगण्यानुसार, अपघातापूर्वी विमानाचा आवाज अत्यंत वेगळा आणि संशयास्पद येत होता," असे रोहित पवारांनी नमूद केले.
५१,००० फुटांची झेप आणि इन्स्पेक्शनचा मुद्दातांत्रिक बाजू मांडताना रोहित पवार म्हणाले की, "लेअरजेट (बंबार्डिअर) हे ५१,००० फुटांपर्यंत उडू शकणारे अतिवेगवान विमान आहे. अशा विमानाचे उड्डाणापूर्वी रीतसर इन्स्पेक्शन (तपासणी) झाले होते का? जर झाले असेल, तर ते करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे." तसेच, अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान 'मुंबई-सुरत-मुंबई' असे फिरून आले होते, असेही त्यांनी सांगितले.
घड्याळाचे '९' आणि जळलेला स्वेटररोहित पवार आजही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. "दादांचे घड्याळ नेहमी १५ मिनिटे पुढे असायचे. अपघात झाला तेव्हा ते ९ वाजता बंद पडले होते. घटनास्थळी सापडलेली बॉडी दादांची नसावी, ते परत येतील असे मला ६ दिवस वाटत होते. तिथे त्यांचा जळलेला स्वेटर आणि चप्पल सापडली आहे," असे सांगताना रोहित पवार भावूक झाले होते.
विमान कंपनीचे '२७' शेअर होल्डर्सज्या व्हीएसआर (VSR) कंपनीचे हे विमान होते, त्या कंपनीच्या मालकी हक्काबाबतही त्यांनी गौप्यस्फोट केला. कागदावर ३ शेअर होल्डर्स दिसत असले तरी प्रत्यक्षात २७ शेअर होल्डर्स आहेत आणि वेळ आल्यास ही नावे उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Web Summary : Rohit Pawar suggests Ajit Pawar's plane crash wasn't accidental, citing CCTV footage, witness accounts, and technical discrepancies. He questions pre-flight inspections, the plane's ownership structure, and personal items found at the crash site, hinting at foul play and demanding a thorough investigation.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार के विमान दुर्घटना को संदिग्ध बताया, सीसीटीवी फुटेज, गवाहों के बयान और तकनीकी विसंगतियों का हवाला दिया। उन्होंने उड़ान से पहले निरीक्षण, विमान के स्वामित्व और दुर्घटनास्थल पर मिली निजी वस्तुओं पर सवाल उठाए, गड़बड़ी का संकेत दिया और गहन जांच की मांग की।