कौतुकास्पद! सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:07 PM2020-09-02T13:07:34+5:302020-09-02T13:13:19+5:30

सोनालीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्ती क्रीडाप्रकारात २ वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे.

Rohit Pawar accepted the responsibility of Sonali Kondiba Mandlik's training | कौतुकास्पद! सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली

कौतुकास्पद! सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या सोनालीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तिने घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सराव सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कुस्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिक हिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात कापरेवाडी गावात कुस्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिक राहते. सोनालीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्ती क्रीडाप्रकारात २ वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे. तसचे, इतर स्पर्धांमध्येही तिने अनेक पदके मिळवली आहेत.

सध्या सोनालीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तिने घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सराव सुरू केला आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी समजली. त्यानंतर रोहित पवार यांनी सोनालीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विटे केल आहे. "सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझे बोलणेही झाले. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. यशाची अशी अनेक शिखरं ती सर करेल, असा मला विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. रोहित  पवार यांच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, सोनाली सध्या कर्जतच्या महाविद्यालयाच १२ वीचे शिक्षण घेत आहे. तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, सोनालीने कुस्ती क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. यासाठी तिला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतःसाठी घर नसतानाही गोठ्यात राहून तिच्या खेळाची तयारी करून घेत आहेत.

आणखी बातम्या...

- तरुणांना भाषण नको, नोकऱ्या पाहिजेत; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

- भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम

- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती    

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

- "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा    

- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा     

Web Title: Rohit Pawar accepted the responsibility of Sonali Kondiba Mandlik's training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.