शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते करणार सुपरक्लास

By admin | Updated: May 28, 2014 01:13 IST

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रिमंडळात परिवहन आणि जहाज बांधणी मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचे मंगळवारी नागपुरात

गडकरींचे जल्लोषात स्वागत : गुरुवारी पदभार स्वीकारणार

नागपूर : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रिमंडळात परिवहन आणि जहाज बांधणी मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचे मंगळवारी नागपुरात विमानाने आगमन झाले. यावेळी गडकरी यांनी आपल्याला मिळालेल्या मंत्रालयाचा वापर करीत विदर्भ व महाराष्ट्रातील रस्त्यांचे नेटवर्क गतीने पूर्ण करणार असल्याचे सांगितले. ‘रोडकरी’ अशी ख्याती असलेल्या गडकरींनी रस्त्यांना प्राधान्य देण्याबाबतचे दिलेले संकेत पाहता ‘अब अच्छे रस्ते होने वाले है!’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

गडकरी यांचे रात्री ९.४० वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. गडकरी विमानतळाबाहेर येताच उपस्थितांनी जयघोष करीत एकच जल्लोष केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, येत्या काळात गरीब, कामगार, शेतकरी यांच्या विकासासाठी सरकार काम करेल. महागाई, बेरोजगार व भ्रष्टाचार या तीन बाबी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. त्या दिशेने काम केले जाईल. आज आपला जन्मदिवस होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळाने मला शुभेच्छा दिल्या. मंत्रिमंडळाची बैठकही उत्तम झाली. दिवसभर भेटणार्‍यांची गर्दी होती. त्यामुळे आज पदभार स्वीकारता आला नाही. उद्या, बुधवारी दुपारी आपण दिल्लीला परतणार आहोत. त्यानंतर गुरुवारी पदभार स्वीकारू, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वागतासाठी उसळलेली गर्दी पाहून ते आनंदाने फुलले होते. ते म्हणाले, नागपूरकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले, विश्वास दाखविला, त्यांच्यामुळेच आज मला ही संधी मिळाली आहे. या संधीचा वापर करीत आपण नागपूर, विदर्भ व महाराष्ट्राचा विकास करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गडकरींच्या स्वागतासाठी महापौर अनिल सोले, आ. सुधाकरराव देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोडमारे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांचीही संख्या लक्षणीय होती. गडकरींनी उपस्थितांना अभिवादन केले. हारतुरे स्वीकारले, नंतर गाडीत बसून हात उंचावून अभिवादन करीत महालच्या दिशेने रवाना झाले. वाटेत सोमलवाडा परिसरात सनराज कन्स्ट्रक्शनतर्फे गडकरींची लाडूतुला करण्यात आली. यावेळी जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडकरींना लाडू भरवण्यात आला. यानंतर उपस्थितांमध्ये लाडू वितरित करण्यात आले. जी.एस. कॉलेजमधील गडकरींच्या मित्रांनीही ताफा थांबवून गडकरींचे स्वागत केले. मिठाई वितरित केली. केंद्रीय परिवहन आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे मंगळवारी रात्री नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.