मीरा रोडमध्ये रिक्षा चालकांचा बंद
By Admin | Updated: February 2, 2017 13:41 IST2017-02-02T13:41:47+5:302017-02-02T13:41:58+5:30
मीरा रोडमधील काशीमीरा परिसरात रिक्षा चालकांनी अचानक बंद पुकारला आहे.

मीरा रोडमध्ये रिक्षा चालकांचा बंद
ऑनलाइन लोकमत
मीरा रोड, दि. 2 - मीरा रोडमधील काशीमीरा परिसरात रिक्षा चालकांनी अचानक बंद पुकारला आहे. बुधवारी रात्री तीन रिक्षा चालकांना मारहाण करण्यात आल्याच्या विरोधात रिक्षा चालकांनी बंदचे हत्यार उपसले आहे. एका बारमालकाने रिक्षा चालकांना मारहाण केल्याचे बोलले जात आहे. मात्र मारहाण करण्यामागील नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
जखमी रिक्षाचालकांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीमुळे हफिक खान या रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे. यामुळे संतप्त रिक्षाचालक निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाचे हत्यार उपसत त्यांनी मारहाण करणा-यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, रिक्षा चालकांनी अचानक बंद पुकारल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षा उपलब्ध नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.