शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

मोदी-फडणवीस यांना उदंड, निरोगी, दीर्घायुष्य लाभो - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 09:18 IST

लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने मुखपत्र सामनातून केली आहे

मुंबई - लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने मुखपत्र सामनातून केली आहे. नक्षलींचा मोदी-फडणवीस यांना मारण्याचा कट होता, लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, त्यांना उदंड, निरोगी, दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छाही सामनातून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या धमकीबाबतच्या कथानकात काही कच्चे दुवे राहिल्यानंच विरोधक टीका करत असल्याचंही ‘सामना’त म्हटले आहे.

पुणे पोलिसांनी भीमा–कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी–फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल. कारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. आम्ही मोदी व फडणवीस यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत असेही सामनातून म्हटले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे