शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

परतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब; शेकडो शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 11:43 PM

चंद्रपुरात सोयाबीन ढीग पाण्यात, यवतमाळ जिल्ह्यात कपाशी आडवी,

चंद्रपूर/ यवतमाळ : कपाशी, सोयाबीन ही पिके हाताशी आलेली असतानाच यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात पीक घरात येण्याच्या स्थितीत असतानाच पावसाने पिकांची धूळधाण उडविली आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ जिल्ह्यात ६६ मिलिमीटर पाऊस बरसला आहे.

परतीच्या पावसाने खरिपातील सोयाबीन, कापूस, धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सोयाबीन व कापूस पिकाला चक्क कोंब आले. त्यामुळे खर्च निघणार की नाही, या प्रश्नाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जवळपास ५० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

दोन दिवस सतत पाऊस बरसत असल्याने सोयाबीनच्या गंज्या भिजल्या. या सोयाबीनला आता कोंब फुटत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी यंदा ढगाळी वातावरणाने कपाशीलाही उशिरा बोंडे फुटली. त्यामुळे दसºया झाल्यावरही अनेकपरतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब शेतकऱ्यांना सीतादही करता आली नव्हती. आता दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचणीच्या अवस्थेत असताना धुंवाधार पावसाने पºहाटीची झाडेच आडवी केली आहेत. तर फुटलेला कापूस ओलाचिंब झाल्याने तो वेचणेही अवघड झाले आहे. शिवाय, कापूस काळवंडल्याने पुढे भावही मिळण्याची शक्यता संपली आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

सध्या सोयाबीन कापणीला आले आहे. काही शेतकºयांनी कापणी करून ढीग तयार केला आहे. परंतु परतीच्या पावसामुळे सोयाबीन ओले झाले असून सोयाबीन शेगांना कोंब आले तर कपाशीची स्थितीही वाईट आहे. लवकर हाती येणारे पीक म्हणून यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहुतांश शेतकºयांनी सोयाबीन कापणी केली आहे. परंतु परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यात गोवरी, सास्ती, माथरा, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव, पोवनी, साखरी, वरोडा, मानोली, बाबापूर, कढोली परिसरातील खरिपातील सोयाबीन, कापूस, धानपिके मातीमोल झाले आहे. मात्र प्रशासनाने याकडे अजूनही लक्ष दिले नाही.

दिवाळीच्या आनंदावर विरजण : शहरात दिवाळीनिमित्त रोषणाईने आसमंत उजळून निघत असताना ग्रामीण भागात परतीच्या पावसाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान केले. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, पीक वाया गेले. त्यामुळे सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या आनंदावर यंदा विरजण पडले आहे.माझ्या शेतात चार एकरातील सोयाबीनची कापणी करून ठेवली. परंतु अचानक आलेल्या पावसाने सोयाबीन पीक खराब झाले. शेंगांना कोंब फुटले. खर्च निघेल की नाही, याची चिंता आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून भरपाई द्यावी. -चेतन बोभाटे, युवा शेतकरी, गोवरी, जि. चंद्रपूरसततच्या पावसामुळे काढलेल्या सोयाबीनला कोंब फुटले, ज्वारी काळी पडली, भारी जमिनीतील कपाशीचे नुकसान होण्याची शक्यता आहे; परंतु तूर व रब्बी पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे. डॉ. विलासराव भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.परतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब शेतकºयांना सीतादही करता आली नव्हती. आता दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचणीच्या अवस्थेत असताना धुंवाधार पावसाने पºहाटीची झाडेच आडवी केली आहेत. तर फुटलेला कापूस ओलाचिंब झाल्याने तो वेचणेही अवघड झाले आहे. शिवाय, कापूस काळवंडल्याने पुढे भावही मिळण्याची शक्यता संपली आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. 

टॅग्स :Rainपाऊस