शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १५ जिल्ह्यात ऑक्टोबर कोरडाच; परतीच्या पावसाने दिला दगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 21:17 IST

मराठवाड्यासह राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यातच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़.

ठळक मुद्दे९ जिल्ह्यात परतीचा किरकोळ पाऊसपरतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईयंदा बंगालच्या उपसागरात असे कमी दाबाचे क्षेत्रच तयार झाले नाही़ त्याचा फटका ओलावा जमिनीत नसल्याने अनेक ठिकाणी रब्बी हंगामही धोक्यात

पुणे : राज्यात जवळपास सर्व ठिकाणी परतीचा पाऊस न झालाच नाही़. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात आॅक्टोबर महिना संपूर्णपणे कोरडा गेला तर ९ जिल्ह्यात केवळ तुरळक ठिकाणी पाऊस झाला़. परतीच्या पावसाने दगा दिल्याने राज्यात सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली असून रब्बीच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला ओलावा जमिनीत नसल्याने अनेक ठिकाणी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे़. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात अनेकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो व त्याचा फायदा मराठवाडा, सोलापूर, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना होत असतो़ .या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन त्याचा फायदा रब्बीच्या पिकांना होतो़. पण यंदा सप्टेंबरमध्ये केवळ एकदाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला़. पण तो ईशान्य भारताकडे गेल्याने मध्य भारत, महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला नाही़. यंदा परतीचा पाऊस होण्याची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागाने आधीच व्यक्त केला होता़. मराठवाड्यासह राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यातच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़. त्यात आॅक्टोंबरमध्ये हमखास पडणाऱ्या परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई झाली असून अनेक ठिकाणी रब्बीच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे़. नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नंदूरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशीम, परभणी या १५ जिल्ह्यात आॅक्टोंबर महिना कोरडा ठणठणीत गेला़. याशिवाय पालघर ९१ टक्के, ठाणे ९२ टक्के, मुंबई उपनगर ९५ टक्के, अहमदनगर ९४ टक्के, औरंगाबाद ९७ टक्के, जालना ९८ टक्के, बीड ९२ टक्के, गोंदिया ९९ टक्के, धुळे ९९ टक्के या जिल्ह्यात अतिशय किरकोळ पाऊस झाला़. याशिवाय बाकी जिल्ह्यांमध्येही थोडा फार पाऊस झाला असला तरी कोणत्याही जिल्ह्यामध्ये आॅक्टोंबरमध्ये पडणाऱ्या पावसाच्या सरीसरी इतका पाऊस कोठेही झाला नाही़. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील पाणीसाठ्यावर झाला असून आगामी रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे़..........बंगालच्या उपसागरात आॅक्टोबरमध्ये मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो, तेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते़. त्याचा फायदा मध्य भारताला होत असतो़. पण यंदा बंगालच्या उपसागरात असे कमी दाबाचे क्षेत्रच तयार झाले नाही़ त्याचा फटका बसला आहे़. हवामान विभागाने याचा अंदाज अगोदरच व्यक्त केला होता़. डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळweatherहवामान