शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीच्या आदल्या दिवशी निवृत्तीस स्थगिती

By admin | Updated: February 2, 2015 08:56 IST

‘सर्व्हिस बुका’त चुकीने नोंदल्या गेलेल्या जन्मतारखेच्या आधारे गावदेवी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविकांत एच. रुपवते यांना नऊ महिने आधीच सेवानिवृत्त

मुंबई: ‘सर्व्हिस बुका’त चुकीने नोंदल्या गेलेल्या जन्मतारखेच्या आधारे गावदेवी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविकांत एच. रुपवते यांना नऊ महिने आधीच सेवानिवृत्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्थगिती दिल्याने रुपवते सेवेत राहणार आहेत.‘सर्व्हिस बुका’त रुपवते यांची जन्मतारीख ४ जानेवारी १९५७ अशी नोंदली गेली आहे व त्याआधारे त्यांना ३१ जानेवारी रोजी निवृत्त केले जाणार होते. परंतु याविरुद्ध रुपवते यांनी केलेल्या याचिकेवर ‘मॅट’चे न्यायिक सदस्य एम.एन. गिलानी यांनी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० जानेवारीला अंतरिम स्थगिती दिली. सेवानिवृत्तीसाठी रुपवते यांची जन्मतारीख ४ आॅक्टोबर १९५७ अशी मानली जावी, असे न्यायाधिकरणाने सांगितले आहे व याचिकेवर तीन आठवड्यांनी अंतिम सुनावणी ठेवली आहे.न्या. गिलानी यांनी अंतरिम निकालात म्हटले की, सर्व्हिस बूक वगळता सर्व कागदपत्रांवर रुपवते यांची जन्मतारीख ४ आॅक्टोबर १९५७ अशीच आहे. एवढेच नव्हेतर, संपूर्ण सेवाकाळात त्यांना दरवर्षी जी ‘जीपीएफ’ची स्लीप दिली गेली त्यावरही हीच तारीख आहे. सर्व्हिस बुकात जन्मतारखेतील महिना चुकून ‘१०’ऐवजी ‘०१’ असा लिहिला गेला असावा, असे सकृतदर्शनी वाटते. शिवाय रुपवते यांचे वरिष्ठ व विभागीय अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीही त्यांची सर्व कागदपत्रे बारकाईने पाहून जन्मतारीख चुकीने लागल्याने ती दुरुस्त करावी, अशी शिफारस केली होती, याचीही ‘मॅट’ने नोंद घेतली.‘महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस (जनरल कंडिशन्स आॅफ सर्व्हिसेस) रुल्स’मधील नियम ३८वर बोट ठेवून सरकारचे असे म्हणणे होते की, जन्मतारीख चुकीची लागली असेल किंवा त्यामध्ये बदल करायचा असेल तर नोकरीस लागल्यापासून पाच वर्षांच्या आत त्यासाठी अर्ज करण्याचे बंधन सरकारी कर्मचाऱ्यावर आहे. परंतु रुपवते यांचे वकील अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी असे निदर्शनास आणले की, नोकरीस लागल्यानंतर १६ वर्षांनी ‘ड्युप्लिकेट सर्व्हिस बूक’ सर्वप्रथम दिले गेले. त्यामुळे नोकरीस लागल्यानंतर ५ वर्षांत अर्ज करणार कसा?‘मॅट’नेही म्हटले की, प्रत्येक विभाग प्रमुखाने हाताखालच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या सर्व्हिस बुकातील नोंदी दाखवून त्यातील नोंदी बरोबर असल्याचे त्यांच्याकडून लेखी लिहून घेण्याचे नियमांचे बंधन आहे. पण रुपवते यांच्या बाबतीत असे कोणी केल्याचे दिसत नाही. (विशेष प्रतिनिधी)