बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या हाेणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 19:57 IST2019-08-22T19:55:39+5:302019-08-22T19:57:05+5:30

इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर हाेणार आहे

The results of the 12th supplementary examination will be announced tomorrow | बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या हाेणार जाहीर

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या हाेणार जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 17 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आलेल्या 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवार) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विषय निहाय मिळालेल्या गुणांची माहिती प्रिंट आऊटद्वारे उपलब्ध हाेणार आहे. 

इयत्ता 12 वीच्या फेब्रुवारी - मार्च या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेतली जाते. त्यानुसार जुलै - ऑगस्ट मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. 

Web Title: The results of the 12th supplementary examination will be announced tomorrow