शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारावी पुरवणी परीक्षेचा शुक्रवारी निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:22 IST

दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतली जाते.

ठळक मुद्देपरीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यकपरीक्षेचा निकाल शुक्रवारी मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २४) दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे.विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर विषय निहाय गुण पाहता येतील तसेच या माहितीची प्रतही घेता येईल.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून इयत्ता दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतली जाते. मंडळामार्फत दि. १७ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दि. २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत गुणांची पडताळणी करण्यासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. तर उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करण्यासाठी दि. २८ आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागले. दोन्ही अर्जांसोबत आॅनलाईन निकालाची प्रत जोडणे आवश्यक आहे.परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मुल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०१९ मधील परीक्षा द्यायची आहे, अशा पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी गुणसुधार योजनेअंतर्गत संधी उपलब्ध असेल, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.-----निकालासाठी संकेतस्थळ - www.ZÔhresu’t

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षाcollegeमहाविद्यालयSchoolशाळाonlineऑनलाइन