साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:35 IST2025-05-07T07:35:02+5:302025-05-07T07:35:16+5:30
चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व मंत्री बैठकीला उपस्थित होते.

साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी
- अण्णा नवथर
लोकमत न्यूज नेटवर्क
चोंडी (अहिल्यानगर) : अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी ५,५००कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. त्यात चोंडी येथील अहिल्यादेवींच्या स्मृतिस्थळाचा विकास करण्यासाठी ६८१ कोटींच्या आराखड्याचाही समावेश आहे.
चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व मंत्री बैठकीला
उपस्थित होते.
महत्त्वाचे निर्णय
अहिल्यादेवी यांनी उभारलेल्या पाणी वाटप प्रणालीचे जतन करण्यात येणार आहे. यामध्ये चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी तलावांसह १९ विहिरी, ६ घाट, ६ कुंड, ३४ जलाशय यांचा समावेश आहे.
इतर मंदिरांसाठी निधी : अष्टविनायक गणपती मंदिर (१४७.८१ कोटी), श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा (१,८६५ कोटी), श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा (२५९.५९ कोटी), श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा (२७५ कोटी), श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा (१४४५.९७ कोटी), श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखडा (८२९ कोटी).