शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना लुटणाऱ्या बँकांना झटका; एटीएम ट्रांझेक्शन लिमिटवर दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 19:38 IST

बऱ्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल होतात.

आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे. बँकांकडून महिन्याला केवळ 5 ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. 

 बऱ्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल होतात. ही ट्रान्झेक्शनही बँका पहिल्या 5 ट्रान्झेक्शनमध्ये धरत होत्या. यामुळे पुढील एटीएम ट्रान्झेक्शनवर बँका शुल्क आकारत होत्या. यामुळे ग्राहकांची लूट होत होती. 

अनेकदा आपण अकाऊंटमधील बॅलन्स, पासवर्ड बदलण्यासाठी एटीएममध्ये जातो. ही ट्रान्झेक्शनही या पाच मोफत ट्रान्झेक्शनमध्ये बँका पकडत होत्या. यामुळे जर पाचनंतरच्या ट्रान्झेक्शनमध्ये तुम्ही अकाऊंट बॅलन्स तपासायला गेला तरीही शुल्क कापले जात होते. यामुळे रिझर्व्ह बँकेकडे वाढलेल्या तक्रारींमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. 

तांत्रिक गोष्टी किंवा एटीएममध्ये पैसे नसल्याने ट्रान्झेक्शन फेल झाल्यास मोफत ट्रान्झेक्शनमध्ये मोजू नये. तसेच नॉन कॅश ट्रान्झेक्शनही या श्रेणीमध्ये पकडू नये अशा सूचना आरबीआयने बँकांना दिल्या आहेत. 

खात्यातील रकमेची माहिती, चेक बुकसाठी अर्ज, टॅक्स भरणा, पैसे ट्रान्सफर या सुविधा पाच ट्रान्झेक्शनच्या लिमिटमध्ये येत नाहीत. 

कशी कराल तक्रार?

रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाईटवर तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (सीएमएस) सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील सर्व बँका आणि वित्तीय संस्था यांच्या विरोधातील तक्रारी या यंत्रणेवर केल्या जाऊ शकतील.वेबसाईटवर तक्रारीचा तपशील दाखल केल्यानंतर ती तक्रार योग्य लोकपालाकडे (ओंबुडसमॅन) अथवा रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयाकडे पाठविली जाईल. तेथे या तक्रारीचा निपटारा केला जाईल.या सुविधेमुळे तक्रार निवारण प्रक्रियेच्या पारदर्शकतेत सुधारणा होईल. तक्रारदाराला स्व-निर्मित (आॅटो-जनरेटेड) पोहोचपावती मिळेल. आपल्या तक्रारीचा मागोवा त्यास ठेवता येईल, तसेच लोकपालाच्या निर्णयाविरुद्ध आॅनलाईन अपीलही करता येईल. तक्रार निवारण व्यवस्थेवर आपल्या अनुभवाबाबतची प्रतिक्रियाही तक्रारकर्ता नोंदवू शकेल.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रatmएटीएम