शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य' केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 15:59 IST

Ramdas Athavale News: पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्स केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र प्रकाश आंबडेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्य शक्य नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

कल्याण - काही दिवसापूर्वी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्स केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र प्रकाश आंबडेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्य शक्य नाही असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

कल्याणनजीक असलेल्या गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाच प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेला केंद्रीय मंत्री आठवले हे आज उपस्थित होते. या प्रसंगी भाजप आमदार किसन कथोरे, महाविद्यालयेच अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आणि रिपब्लीकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थीत होते. या शोकसभे पश्चात केंद्रीय मंत्री आठवले यांनी उपरोक्त वकव्य केले आहे. आठवले यांनी सांगितले की, कवाडे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या ऐक्याच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांशीशिवाय ऐक्य अशक्य आहे. त्यांना घेऊन ऐक्य केल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यास मी तयार आहे.

आंबेडकरांच्या पक्षात रिपब्लीकन नाव नसेल. मात्र त्यांचे काम रिपब्लीकन पक्षाप्रमाणेच आहे. यापूर्वीही रिपब्लीकन ऐक्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला फारसे यश मिळाले नाही. आंबडेकर यांचा वंचित बहुजन आघाडीला निवडणूकीत चांगली मते मिळाली. मात्र मते खाण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे. निवडणूका लढवून त्यांनी सत्तेत यावे. मते खाण्याचे राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही या भाजपच्या भूमिकेशी सहमत असल्याचे आठवले यांनी सांगितले. राष्ट्रवादीला देशात मान्यता नाही. हा पक्ष महाराष्ट्रापुरता आहे. देशातील काही राज्यात शरद पवार यांचे संघटन आहे. उत्तर प्रदेशात जे भाजप सोडून गेले त्यामुळे त्यांचेच नुकसान होईल. त्यांच्या सोडून जाण्याने भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप ३०० जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी किती प्रचार केला भाजपला हरविणे ये-या गबाळ्य़ाचे काम नाही असा टोला आठवले यांनी समाजवादी नेते अखिलेश यादव यांना लगावला आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे